कोरोना काळात (Coronavirus) नोकरी गेली म्हणून या तरुणाने भाजीपाला विकण्यास सुरूवात केली. पण या व्यवसायातून त्याची पावलं भलतीकडेच वळली आणि आता त्याला पोलीस कारवाईला (Mumbai Police) सामोरं जावं लागत आहे.
मुंबई, 18 मार्च: कोरोना काळात (Coronavirus) नोकरी गेली म्हणून या तरुणाने भाजीपाला विकण्यास सुरूवात केली. पण या व्यवसायातून त्याची पावलं भलतीकडेच वळली आणि आता त्याला पोलीस कारवाईला (Mumbai Police) सामोरं जावं लागत आहे. मुंबईतील कुरार पोलीस स्टेशन हद्दीतील तानाजी नगर परिसरात ही घटना घडली. याठिकाणी एक भाजीचं गोडाऊन आहे. त्यात एक व्यक्ती गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा ठेवत असल्याची सूचना कुरार पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर कुरार पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रकाश वेले यांच्या नेतृत्वाखाली पीआय चाळके, पीआय पितळे आणि एपीआय भोये आणि इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी गोडाऊवर छापा टाकला.
याठिकाणी कांद्याच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या, मात्र त्याआड गांजाचा मोठा साठा देखील लपवण्यात आला होता. पंचनामा केल्यानंतर कुरार पोलिसांनी 3 पोती गांजा जप्त केला. या गांजाची किंमत साधारण 9 लाख 45 हजारांच्या आसपास आहे.
(हे वाचा-महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; वरिष्ठाच्या Whatsapp मेसेजमुळेच घडली घटना?)
या तरुणाची कहाणी अशी आहे की, लॉकडाऊन काळात या तरुणाची नोकरी गेली होती. तेव्हा त्याने पोटापाण्यासाठी भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तो थेट शेतातून शेतमाल मागवून ग्राहकांना विकत असते. या 28 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर कुरार गावातील श्रीराम नगर परिसरात राहत होता. घरापासून थोड्या अंतरावरच त्याचे भाजीचे गोडाऊन होतं. याठिकाणी तो भाजीपाल्या बरोबरच गांजा ठेवत असे. संबंधित आरोपीचं नाव सचिन आहे. याठिकाणी पोलिसांनी 63 किलो गांजा जप्त केला आहे. ओडिशामधून आलेल्या भाजीच्या साठ्यातून हा गांजा मुंबईत आणण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत साधारण 9 लाख 45 हजारांच्या आसपास आहे.
(हे वाचा-पुण्यात 'डोंगरबाबा'चा उच्छाद; कोरोनाची भीती घालून पोखरला डोंगर)
दरम्यान आरोपीला कलम 31/21सेक्शन 8(क) 20(ब )(3) (क) एनडीपीएस कायद्याअंतर्गत (1985) अटक करण्यात आली आहे. त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस रिमांडमध्ये ठेवण्यात आलं होतं. आठवडाभरापूर्वी कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत क्राइम ब्रँच युनिटने 12 रेड टाकण्यात आली होती, मात्र त्यावेळी केवळ 2 किलो गांजा जप्त करण्यात या युनिटला यश मिळालं होतं. याच चौकशी दरम्यान सचिनचं नाव समोर आल्याची देखील माहिती मिळते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.