मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सोलापूरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; वरिष्ठानेच WhatsApp मेसेज करुन जवळीक साधण्याचा आरोप

सोलापूरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; वरिष्ठानेच WhatsApp मेसेज करुन जवळीक साधण्याचा आरोप

महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या (Sulapur woman police officer commits suicide) केली आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या (Sulapur woman police officer commits suicide) केली आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या (Sulapur woman police officer commits suicide) केली आहे.

सोलापूर, 17 मार्च : सोलापुरात महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या (Sulapur woman police officer commits suicide) केली आहे. सोलापूर शहर आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात ही महिला पोलिस कर्मचारी कार्य़रत होती. याच पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हॉट्सॲपवर मॅसेज (WhatsApp message) करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास दिला आणि त्यामुळेच महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिला कर्मचाऱ्याच्या पतीने केला आहे.

जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्य़रत असणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा मानसिक त्रास दिल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे. या घटनेबाबत पोलिसात अद्याप कोणतीही तक्रार नोंद केलेली नाही. सोलापूर शहरपासून जवळ असलेल्या एका गावाजवळ महिलेने विष प्राशन केलं होतं. महिलेच्या नातेवाईकाने बेशुद्धावस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, "मृत महिला पोलीस कर्मचारी आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी या दोघांमध्ये काही चॅटिंग झालं होतं. याच चॅटिंगवरुन महिलेच्या घरात वाद निर्माण झाले होते. मात्र हे चॅटिंग नेमकं काय होतं, महिलेने आत्महत्या कशामुळे केली हे प्राथमिक तपासात पुढे आलेलं नाही. महिलेचे नातेवाईक सध्या दु:खात असल्याने अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र या घटनेचा सविस्तर तपास करुन जर कोणी दोषी असेल तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल," अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत महिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सोलापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Solapur, Solapur (City/Town/Village)