मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'ओठांचं चुंबन घेणं, प्रेमाने स्पर्श करणं हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान

'ओठांचं चुंबन घेणं, प्रेमाने स्पर्श करणं हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान

Bombay High Court, Mumbai News : न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना सांगितले की, मुलाची वैद्यकीय तपासणी लैंगिक शोषणाच्या आरोपाला समर्थन देत नाही. ते म्हणाले की, आरोपीच्या विरोधात लावलेल्या POCSO च्या कलमांतर्गत जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि त्याला जामीन मिळू शकतो.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 मे : भारतीय दंड संहितेच्या कलम 377 नुसार ओठांचं चुंबन घेणे आणि प्रेमाने स्पर्श करणे हा अनैसर्गिक गुन्हा नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) व्यक्त केलं आहे. यासोबतच एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी नुकतेच एका व्यक्तीची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. 14 वर्षीय मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर गेल्या वर्षी या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

एफआयआरनुसार, मुलाच्या वडिलांना त्यांच्या कपाटातून पैसे गायब आढळले. त्या मुलाने आरोपीला पैसे दिल्याचं सांगितलं. ऑनलाइन गेम 'ओला पार्टी'साठी रिचार्ज करण्यासाठी तो मुंबईतील उपनगरातील आरोपी व्यक्तीच्या दुकानात जात असे, असं या अल्पवयीन मुलाने सांगितलं.

मुलाने आरोप केला आहे की, एके दिवशी तो रिचार्ज करण्यासाठी गेला, तेव्हा आरोपीने त्याच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. त्यानंतर, मुलाच्या वडिलांनी बाल लैंगिक गुन्ह्यांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 377 च्या संबंधित कलमांतर्गत आरोपीविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला.

कलम 377 नुसार, शारीरिक संबंध किंवा इतर कोणतंही अनैसर्गिक कृत्य हे दंडनीय गुन्ह्याच्या कक्षेत येतं. या अंतर्गत, जास्तीत जास्त शिक्षा जन्मठेपेची असू शकते आणि जामीन मिळणं कठीण होतं.

हे वाचा - देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, काँग्रेस एका कुटुंबाला एकच तिकीट देणार

न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना सांगितलं की, मुलाची वैद्यकीय तपासणी लैंगिक शोषणाच्या आरोपाला समर्थन देत नाही. ते म्हणाले की, आरोपीच्या विरोधात लावलेल्या POCSO च्या कलमांतर्गत जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि त्याला जामीन मिळू शकतो.

हे वाचा - मंडपातून थेट तुरुंगात पोहोचला नवरदेव; वराच्या धाकट्या भावासोबत लावलं नवरीचं लग्न

न्यायालयानं म्हटलं की, सध्याच्या प्रकरणात अनैसर्गिक लैंगिक संबंध ही बाब प्रथमदर्शनी लागू नाही. उच्च न्यायालयाने सांगितलं की, आरोपी आधीच एक वर्षापासून कोठडीत आहे आणि खटला लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. उच्च न्यायालयानं सांगितलं की, "वरील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेता, अर्जदाराला जामीन मिळण्याचा अधिकार आहे." यासह, आरोपीला 30,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

First published:

Tags: Mumbai high court, The Bombay High Court