Home /News /national /

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, काँग्रेस एका कुटुंबाला एकच तिकीट देणार, चिंतन शिबिरात मोठे निर्णय

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, काँग्रेस एका कुटुंबाला एकच तिकीट देणार, चिंतन शिबिरात मोठे निर्णय

काँग्रेसच्या आजच्या चिंतन शिबिरात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

    प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 15 मे : काँग्रेसच्या गोटातून एक खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस पक्षाने देशभरात पुन्हा मोठी झेप घेण्यासाठी आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या सर्वच दिग्गज नेत्यांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येत आहे. काँग्रेसच्या आजच्या चिंतन शिबिरात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काँग्रेस आता एका कुटुंबाला निवडणुकीचं एकच तिकीट देणार आहे. याचा अर्थ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला ते तिकीट मिळेल. दुसऱ्या सदस्याला तिकीट हवं असल्यास त्याने पक्षासाठी निदान 5 वर्षे काम केलेलं असणं अनिवार्य असेल. त्या व्यक्तीने पक्षासाठी सक्रीय काम केलं असेल तरच त्या व्यक्तीला तिकीट मिळेल. काँग्रेसच्या चिंतन शिबिरात आज असे अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काँग्रेस चिंतन शिबिरात कार्यकारिणीने अनेक निर्णयांना मान्यता दिली : 1) काँग्रेस संघटनेत एकाच पदावर एक टर्म (5 वर्षे) पूर्ण केल्यानंतर पुन्हा लगेच संधी मिळणार नाही. 3 वर्षांचा कुलिंग ऑफ कालावधी असेल आणि त्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती करता येईल. 2) प्रत्येक राज्यात राजकीय व्यवहार समिती असेल. 3) शेतीला उद्योगाचा दर्जा दिला जाईल. 4) MSP हमी कायदा करेल. एमएसपीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांची पिके खरेदी करता येणार नाहीत. 5) संघटनेतील 50 टक्के पदे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिली जातील. 6) CWC मध्ये एक उपसमिती देखील स्थापन केली जाईल, जी सर्व प्रकरणांवर काँग्रेस अध्यक्षांना मत देईल. 7) एका कुटुंबाला एकच तिकीट मिळेल, दुसर्‍या सदस्याने पक्षाला 5 वर्षे दिली असतील, म्हणजे पक्षासाठी सक्रिय काम केले असेल तरच तिकीट मिळेल. (भारताने इतिहास घडवला, बलाढ्य इंडोनेशियाला पराभूत करत पटकावले विजेतेपद) 8) काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडी समिती स्थापन केली जाईल, ज्याचे सदस्य CWC मधून घेतले जातील. ही समिती संसदीय मंडळाप्रमाणे काम करेल ज्याची मागणी G23 नेत्यांनी केली होती. म्हणजे महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर अध्यक्ष या समितीचे मत घेतील. 9) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटना, ओबीसी/एससी/एसटी महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले जाईल. 10) शेतकरी कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली जाईल. 11) वीजबिल माफ आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली जाईल. 12) देशातील अंतर्गत निवडणुका आणि निवडणुकांसाठी पक्षात कायमस्वरूपी विभाग तयार करण्यात येणार आहे. 13) आम्ही सत्तेत आल्यास ईव्हीएमवर बंदी घालू आणि पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेऊ. 14) काँग्रेस चिंतन शिबिरामध्ये राजकीय समितीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे प्रस्ताव आले आहेत. या प्रस्तावांना उदयपूर डिक्लेरेशन या नावाने घोषित करण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीची समितीची बैठक संपली की ही घोषणा करण्यात येईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 'जनतेसोबत चर्चा की जनतेसोबत हिंसा? यामध्ये निवडण्याची वेळ आली आहे' काँग्रेसच्या चिंतन शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इतर नेत्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सर्वांना मनलावून काम करण्याचं आवाहन केलं. "देशात अशी कुठली दुसरी पार्टी आहे जी देशात अशाप्रकारे चर्चा करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचा संवादाला कधीच संधी देणार नाही. दलित म्हणून भारतीय जनता पक्ष संधी देत नव्हती हे आर्या यांनी मला सांगितले आहे. काँग्रेससारखा असा दुसरा पक्ष नाही ज्यामध्ये भीती शिवाय बोलता येतं. जनतेसोबत चर्चा की जनतेसोबत हिंसा? यामध्ये निवडण्याची वेळ आली आहे. देशातील संस्थांचा पद्धतशीरपणे नाश केला जात आहे. संसदेमध्ये जे होत आहे ते आपण पाहत आहोत. न्याय पालिका दबावात आहे", असं राहुल गांधी म्हणाले. "पेगसेस बद्दल सर्वाना माहीत आहे. राजकीय चर्चा संपविण्याचे ते साधन आहे. काँग्रेस याचा विरोध करीत आहे. काँग्रेस पक्षाचे महान नेते महात्मा गांधी, ज. नेहरू, सरदार पटेल अशी मांडणी आहेत का? आझाद यांनी आम्हाला तयार करण्यात मदत केली. हे व्यक्ती किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. देशाच्या कण्याला तोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने केले आहे. देशातील युवा रोजगार मिळू शकणार नाही. एकीकडे बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. काँग्रेससोबत जनतेचे नाते हे तुटले आहे. त्याला पुन्हा जोडण्याचे काम आता करण्याची काळाची गरज आहे", असं आवाहन राहुल गांधींनी केलं.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या