Home /News /crime /

मंडपातून थेट तुरुंगात पोहोचला नवरदेव; ऐनवेळी वराच्या धाकट्या भावासोबत लावलं नवरीचं लग्न

मंडपातून थेट तुरुंगात पोहोचला नवरदेव; ऐनवेळी वराच्या धाकट्या भावासोबत लावलं नवरीचं लग्न

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं व्यावसायिकाला महागात पडलं आहे. वरमाळेच्या कार्यक्रमानंतर नवरी नवरदेव फेरे घेण्याच्या तयारीत होते. मात्र, पहिल्या पत्नीचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.

    लखनऊ 15 मे : ताजनगरी आग्रा येथे पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं व्यावसायिकाला महागात पडलं आहे. वरमाळेच्या कार्यक्रमानंतर नवरी नवरदेव फेरे घेण्याच्या तयारीत होते. मात्र, पहिल्या पत्नीचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान बराच गदारोळ झाला. यानंतर पोलिसांनी नवरदेवाला पकडून ताजगंज पोलीस ठाण्यात आणलं. त्याला संपूर्ण रात्र लॉकअपमध्ये काढावी लागली (Police Arrested Groom from Wedding). तर, नवरीचं लग्न वराच्या धाकट्या भावाशी लावून देण्यात आलं. ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच चर्चा रंगली आहे. स्टेजवर अचानक असं काही आठवलं की नवरीने मध्येच थांबवलं लग्न, कारण जाणून चक्रावून जाल मिळालेल्या माहितीनुसार, ताजगंज परिसरात राहणाऱ्या मोबाईल व्यापाऱ्याचं १६ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न झालं होतं. त्याला एक मुलगीही आहे. आरोपानुसार, सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याने व्यावसायिकाच्या पत्नीने 25 ऑक्टोबर 2017 रोजी महिला पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नसल्याचं सांगण्यात येत आहे. अशात तिचा पती लग्न करत असल्याचं समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटस्फोटाचे कागद दाखवण्यास सांगितले, मात्र नवरदेवाकडच्यांकडे दाखवण्यासाठी काहीही नव्हतं. यानंतर पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतलं आणि तुरुंगात टाकलं. वरात घेऊन निघाला मात्र रस्त्यातच केलं भलतंच कांड अन् थेट रुग्णालयात पोहोचला नवरदेव, नवरीने मोडलं लग्न ताजगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक भूपेंद्र कुमार बालियान यांनी सांगितलं की, रात्रीपर्यंत याप्रकरणी कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नाही. यावरून नवरदेवावर शांतता भंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्याला पीआरव्हीने पकडून पोलीस ठाण्यात आणलं. दुसरीकडे, नवरदेवाचं सत्य समोर आल्यानं वधूच्या कुटुंबीयांनीही एकच गोंधळ घातला. फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर घरच्यांनी बसून चर्चा केली. यानंतर मोबाईल व्यापाऱ्याच्या धाकट्या भावाशी नवरीचं लग्न लावण्यात आलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bridegroom, Crime news, Wedding

    पुढील बातम्या