लोकलमध्ये 'किकी चँलेंज' करणं पडलं महाग, साफ करावं लागलं विरार स्टेशन

लोकलमध्ये 'किकी चँलेंज' करणं पडलं महाग, साफ करावं लागलं विरार स्टेशन

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : पश्चिम उपनगरिय रेल्वे मार्गावरील अत्यंत गर्दिच्या विरार रेल्वे स्थानकावर 'किकी' स्टंट करून जीव धोक्यात घालणाऱ्या तीन तरूणांना मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली. या रेल्वे स्थानकावर त्यांनी 'किकी' स्टंट करून त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर आणि युट्यूबवर अपलोड केला होता. असे स्टंट करणाऱ्या बाकीच्या तरूणांना लक्षात राहील अशी शिक्षा अटक करण्यात आलेल्या या तीन तरूणांना सुनावण्यात आली आहे. किकी' स्टंट करू पारणाऱ्यां तरूणांना यातून नक्कीच धडा मिळेल असा विश्र्वास न्यायाधिशांनी व्यक्त केलाय.

जगभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेल्या 'किकी चॅलेंज'चं वेड अनेक तरुणांना लागलं आहे. शाम राजकुमार शर्मा (वय 24), निशांत राजेन्द्र शाह (वय 20) आणि ध्रुव अनिल शाह (वय 23) अशी तिघांची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या या तरूणांना कोर्टाने एक अनोखी शिक्षा सुनावली आहे. विरारच्या ज्या प्लॅटफार्म या तिघांनी स्टंटबाजी केली होती आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल केले होते, तीन तासात तोच प्लॅटफार्म स्वच्छ करण्याचे आदेश कोर्टाने त्यांना दिले. एवढ्यावचं सगळं संपलं असं नाही, तर या तिघांनी त्याच प्लॅटफार्मवर उभं रहावं आणि असे प्रकार कसे धोकादायक आणि गैरकायदेशी आहेत याची माहिती त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना द्यावी.

किकी स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणांचा शोध सुरू केला होता. विरार रेल्वे पोलिसांच्या पथकानं खबऱ्यांच्या मदतीनं या तिघांना बुधवारी विरारमधूनच हुडकून काढलं होतं. गुरूवारी न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली. यामुळे 'किकी' स्टंट करू पारणाऱ्यांना धडा मिळेल असा विश्र्वास न्यायाधिशांनी व्यक्त केलाय.

PHOTOS : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम

VIDEO : 'आरक्षण आमच्या हक्काचं...नाही कोणाच्या...',काकांच्या घराबाहेर पुतण्याचा 'ठिय्या'

विमानात बाळ रडल्यामुळे भारतीयांना विमानातून उतरवलं

 

First published: August 9, 2018, 9:05 PM IST

ताज्या बातम्या