VIDEO : 'आरक्षण आमच्या हक्काचं...नाही कोणाच्या...',काकांच्या घराबाहेर पुतण्याचा 'ठिय्या'

VIDEO : 'आरक्षण आमच्या हक्काचं...नाही कोणाच्या...',काकांच्या घराबाहेर पुतण्याचा 'ठिय्या'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील `गोविंदबाग`या बंगल्यासमोर मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी आज ठिय्या धरला

  • Share this:

बारामती, 09 आॅगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आज मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन केलं. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि पुतणे अजित पवारही आंदोलनात सहभागी झाले होते. अजित पवारांनीही 'एक मराठा...लाख मराठा, अशा घोषणा' देत आंदोलकांना जोरदार पाठिंबा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील `गोविंदबाग`या बंगल्यासमोर मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी आज ठिय्या धरला.  बारामतीत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन गेले काही दिवस सुरू होते. शरद पवार यांच्याही घरासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी आठ वाजता आंदोलक गोविंदबागेसमोर जमले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास अजित पवार हे तेथे पोहचले. त्यावेळी खुद्द अजित पवार रस्त्यावर खाली बसत आंदोलनात सहभागी झाले.

त्यानंतर त्यांनी हातात माईक घेतला. मराठा आंदोलकांच्या घोषणाही त्यांनी दिल्या. "एक मराठा..लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं...नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही" अशी नारेबाजी त्यांनी केली. आंदोलकांनी दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले.

मराठा आंदोलनाचा राज्यभर धडाका सुरt असून बडे नेतेही त्यात सहभागी झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आजच्या बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर त्यांचे पुतणे अजित पवारांचे हा तसा नोंद घ्यावा असाच एक क्षण.

तर दुसरीकडे, 07 आॅगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर घंटानाद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने चव्हाण यांच्या शिवाजी नगर येथील निवासस्थानी जमले होते. घरासमोर आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणा ऐकून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण ह्या खाली आल्या.

आल्या आल्या अमिता चव्हाण यांनी देखील मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. 'मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही...घेतल्याशिवाय राहणार नाही' अशा घोषणाच अमिता चव्हाण यांनी दिल्या. त्यानंतर त्या देखील ठिय्यामध्ये सहभागी झाल्या. अमिता चव्हाण आणि आमदार डी. पी सावंत दोघेही आंदोलकांसोबत रस्त्यावर बसले. ठिय्या संपल्यानंतर पुन्हा अमिता चव्हाण यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.

First published: August 9, 2018, 7:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading