नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट- विमानात प्रवासादरम्यान तीन वर्षांचे बाळ रडल्यामुळे युरोपातील ब्रिटीश एअरवेजच्या लंडन- बर्लिन (बीए८४९५) या नावाजलेल्या विमान कंपनीने भारतीय कुटुंबाला विमानातून उतरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विमानातील प्रवासादरम्यान, तीन वर्षांचे बाळ रडत होते. त्याची आई त्याला शांत करण्याचा प्रयत्नही करत होती. दरम्यान, विमानातील कर्मचाऱ्याने त्याला भीती दाखवली. त्यामुळे ते मूल आणखीन रडू लागलं. त्या कर्मचाऱ्याने आक्षेपार्ह टिप्पणी करत त्यांना विमानातून उतरवलं असा आरोप त्या भारतीय कुटुंबियांनी केला आहे. विमानातील इतर भारतीयांनीही त्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्या मुलाचे रडणे शांत होत नव्हते. त्या कर्मचाऱ्याने इतर भारतीयांनाही विमानातून खाली उतरवलं असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. मुलाचे वडील हे रस्ते वाहतूक मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना सांगितला. सीटबेल्ट बांधताना आमचा मुलगा रडू लागला त्याला शांत करण्याचा पत्नी प्रयत्न करत असताना, विमानातील काही कर्मचारी तिच्यावर ओरडू लागले. त्यामुळे मूल आणखीन घाबरलं. तसंच हे असंच रडलं तर त्याला उड्डाणावेळी खिडकीतून बाहेर फेकून देण्यात येईल असंही ते कर्मचारी म्हणाले अशी तक्रार त्या कुटुंबियांनी केली. याप्रकरणी एअरलाइन्सने अशा घटनांचा गांभीर्याने विचार करुन, लवकरात लवकर कार्यवाई करु. प्रवाशांसोबत भेदभाव करणं सहन केलं जाणार नसून, या घटनेची तातडीने चौकशी सुरू केली आहे, असे ब्रिटीश एअरवेजच्या प्रवक्याने म्हटले. हेही वाचा-
VIDEO : अशोक चव्हाणांच्या वृत्तपत्राचे कार्यालय फोडले
VIDEO :घोषणा थांबल्या,आंदोलक बाजूला झाले,अन् अॅम्ब्युलन्स सुसाट गेली!
मध्यरात्री ३ वाजता फोन करुन हा मेसेज द्यायचे शहीद मेजर कौस्तुभ राणे

)







