डोंबिवली, 30 मे : कोरोना काळात (Coronavirus) सर्व काही बंद असताना डोंबिवलीमध्ये (Dombivali) मात्र एका आठवड्यात दुसऱ्यांदा बैलगाडा शर्यत (Bullock cart race) झाली. डोंबिवली जवळील अंतार्ली (Antarli Village Dombivali) गावात या बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत कोरोना नियमांना पायदळी तुडवत या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलिस मात्र या सर्वापासून अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळत आहे. (वाचा- बाळासाहेबांचा विसर पडला, नेहरुंचीच पुण्याई आठवतेय! दरेकरांची राऊतांवर बोचरी टीका ) सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली आहे. तरीही न्यायालयाचे आदेश झुगारून कल्याण ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. स्थानिक मानपाडा पोलिसांना मात्र याबाबत काहीच माहिती नाही हे विशेष. शर्यतींना शेकडोंच्या संख्येने गर्दी जमली त्यामुळं आणि सहाजिकच कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले. सहा दिवसांपूर्वी अंबरनाथ तालुक्यात उसाटने गावात बैलगाडा शर्यत झाली. हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या शर्यतीचीही पोलिसांना कल्पनाही नव्हती. अखेर प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल झाले. (वाचा- मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन प्रकरण; नागपुरातून एकाला अटक ) त्यानंतर आता आता बैलगाडा शर्यतीानपाडा पोलीस ठाण्याच्या अंतार्ली गावात बैलगाडा शर्यती भरवल्याचं समोर आलं आहे. एकिकडं ग्रामीण भागात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत कुणाच्या आशिर्वादानं या शर्यती भरवल्या जात आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी 7 वाजेपासून या शर्यती सुरू झाल्या. पोलिसही यात बघ्याची भूमिका घेत असल्याचं समोर आलं. एकिकडं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं जमावबंदी जाहीर केली आहे. मात्र मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैलगाडा शर्यतींची जत्राच भरली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं आता पोलिसांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागले आहे. कोरोना काळात सगळीकडे रस्त्यावर पोलिस तैनात आहेत. त्यात न्यायालयाची बंदी असताना शर्यतीसाठी या बैलगाड्या दाखल कशा झाल्या हा मोठा प्रश्न आहे. पोलिसांना याबाबत काहीच कसं कळलं नाही, याचंही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







