मराठी बातम्या /बातम्या /nagpur /मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन नागपुरातून; उमरखेड येथून एकाला अटक

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन नागपुरातून; उमरखेड येथून एकाला अटक

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा कॉल केल्या प्रकरणात नागपूर येथून सागर मांढरे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा कॉल केल्या प्रकरणात नागपूर येथून सागर मांढरे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा कॉल केल्या प्रकरणात नागपूर येथून सागर मांढरे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे

मुंबई, 30 मे: आज दुपारच्या सुमारास मंत्रालयात (Mantralaya) बॉम्ब ठेवण्याचा निनावी कॉल (bomb hoax call) आला आणि एकच खळबळ उडाली. यानंतर तात्काळ मंत्रालयात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं. या पथकाने केलेल्या तपासात बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य अशी कुठलीही वस्तू आढळून आली नाही आणि हा एक फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणाता आता नागपूर (Nagpur) येथून एकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा तो निनावी कॉल नागपूर येथून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी नागपूर येथील उमरखेडमधून एका 43 वर्षीय इसमाला अटक केली आहे. या व्यक्तीचं नाव सागर मांडरे (Sagar Mandare) असे असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन

आज दुपारच्या सुमारास मंत्रालय परिसरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन कॉल मंत्रालयातील कंट्रोल रूमला आला. या नंतर तात्काळ पोलीस, बॉम्ब शोधक पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केलं.

आज रविवार असल्याने संपूर्ण मंत्रालयात कर्मचारी, मंत्री तसेच इतर नागरिकही उपस्थित नव्हते. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि खबरदारी म्हणून मंत्रालयाचे सर्व गेट्स बंद करून तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, तपासाअंती तो एक फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

First published:

Tags: Nagpur