मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पत्रकारांना corona vaccine मिळणार! आव्हाडांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

पत्रकारांना corona vaccine मिळणार! आव्हाडांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

 वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ऑनलाइन ई-भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ऑनलाइन ई-भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

पत्रकारांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 एप्रिल : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशात 1,03,844 नव्या रुग्णांची नोंद (Corona patients in India) करण्यात आली आहे. आतार्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांनी एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य सरकारनं नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे.

सध्या संपूर्ण देशात 45 वर्षांच्या वरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येते. लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सरकारी पातळीवरुन प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडं एक विशेष मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडं पत्रकारांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे. आव्हाड यांनी याबाबत एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडं ही मागणी केली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचं रविवारी निधन झालं. पालकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडं ही विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आव्हाडांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.

( वाचा : पुढच्या दोन आठवड्यात होणार कोरोनाचा महाउद्रेक! शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा )

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची स्थिती भयावह बनत चालली आहे. महाराष्ट्रात रविवारी कोविड- 19 च्या रुग्णांत 57,074 ने वाढ झाली आहे. एकाच दिवशी झालेल्या रुग्ण वाढीमध्ये ही सर्वात मोठी नोंद आहे. यामुळे राज्यात संक्रमित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 30 लाख 10 हजार 597 वर पोहचली आहे. मागील चोवीस तासांत 222 रूग्णांच्या मृत्यूबरोबरच, राज्यात मृतांची संख्या 55 हजार 878 वर पोहचली आहे. दुसरीकडे रविवारी 27 हजार 508 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

First published:

Tags: Covid-19 positive, Covid19, Death, Jitendra awhad, Reporter, Uddhav thackeray