Home /News /coronavirus-latest-news /

Coronavirus: पुढच्या दोन आठवड्यात होणार कोरोनाचा महाउद्रेक! शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

Coronavirus: पुढच्या दोन आठवड्यात होणार कोरोनाचा महाउद्रेक! शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

येत्या दोन आठवड्यांत जागतिक स्तरावर दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये (Corona Cases) मोठी वाढ होईल. कोरोनाचा प्रसार झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णसंख्या असेल.

    नवी दिल्ली 05 एप्रिल : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ (Corona Updates) होत आहे. याचदरम्यान एका अमेरिकी संसर्गजन्य रोग तज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे, की येत्या दोन आठवड्यांत जागतिक स्तरावर दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये (Corona Cases) मोठी वाढ होईल. अमेरिकन टेलिव्हिजन चॅनेल एनबीसीच्या ‘मीट द प्रेस शो’मध्ये मिनेसोटाच्या सेंटर फॉर इन्फेक्टीव्ह डिसिज रिसर्च अँड पॉलिसीचे संचालक मायकेल ऑस्टरहोलम म्हणाले की, जागतिक स्तरावर कोरोना विषाणूचा धोका पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे. मायकेल म्हणाले, येणाऱ्या काळात संक्रमणाच्या वाढत्या घटनांच्या मोठी वाढ होईल आणि कोरोनाचा प्रसार झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णसंख्या असेल. ते म्हणाले, की माझ्या मते सध्या संपूर्ण जग कोरोना संसर्गाच्या प्रकरणात पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळाचा सामना करत आहे. पुढच्या दोन आठवड्या आपल्याला असं जाणवेल, की कोरोनाचे रोज समोर येणारे रुग्ण आजाराच्या प्रसारापासूनचे सर्वाधिक रुग्ण असतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या डिसेंबर 2020 मध्ये आढळून आली होती. लसीकरण सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत बरीच घट झाली. मात्र, भारत, अमेरिका, ब्राझील, इटली आणि जर्मनीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मोठं संकट उभं ठाकलं आहे. अमेरिकी आरोग्य विशेषतज्ञ म्हणाले, की अमेरिकेबद्दल बोलायचं झाल्यास, आता केवळ रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे, मात्र पुढे ही संख्या आणखी वेगानं वाढणार आहे. चिंताजनक बाब म्हणजेच भारतात शुक्रवारी इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. टक्केवारीनुसार पाहिल्यास भारतात अमेरिकेपेक्षाही अधिक रुग्णसंख्या आढळत आहे. मागील 50 दिवसात कोरोना रुग्णसंख्येत दहा पटीनं वाढ झाली आहे. हे आकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केले आहेत. जागतिक स्तरावर मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या सर्वाधिक नोंदवली गेली होती. जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या कोरोना वायरस रिसोर्स सेंटरच्या म्हणण्यानुसार, जगभरातून आतापर्यंत 13 कोटीहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर, 28.4 लाखाहून अधिक लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona, Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या