कोल्हापूर, 11 डिसेंबर : महाविकास आघाडी सत्ता जाताच महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर ईडीचे छापे पडत आहेत. दरम्यान नव्या वर्षात पहिलीच छापेमारी महाविकास आघाडीचे मोठे नेते कोल्हापूर जिल्ह्यातील माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांनी घरावर आज सकाळी छापे पडले. आज सकाळी त्यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. सकाळी 6 वाजल्यापासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान हसन मुश्रीफ मुंबईत असल्याने त्यांना माहिती मिळताच ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी हसन मुश्रीफ हे दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्या मुळ निवासस्थानी कागल येथे येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता असल्याने ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
दरम्यान मुश्रीफांच्या घरावर छापे पडताच घटनास्थळी सीआरपीएफचे जवान एके 47 घेऊन हजर झाले. ही कारवाई झाल्याचे समजताच मुश्रीफांचे कार्यकर्ते एकत्र येत कागल, मुरगुड बंद करण्यात आला आहे. तसेच पुढच्या काही तासाभरात राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचे आवाहन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. कागल परिसरातील मुश्रीफांचे कार्यकर्ते येत त्यांच्या घराकडे येत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांचावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. 2700 पानी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
यासाठी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या ऑफिसमध्ये गेले होते. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले, अशी माहिती सोमय्यांनी दिली होती.