मुंबई, 25 मार्च : ‘शिरोळ्याचे अपक्ष आमदार राजेंद्र येद्रावकर हे महाविकास आघाडीमध्ये येऊ नये म्हणून त्यांच्यावर पाळत ठेवली होती. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी त्यांना पैशांची ऑफर दिली होती. त्या कुणासाठी काम करत होत्या. मुळात शुक्ला या भाजपच्या एजंट होत्या, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंग प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर हे भाजपमधये न येता महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार होते. पण रश्मी शुक्ला यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यावर दबाव टाकला. त्यांना पैशांची ऑफर सुद्धा दिली होती, त्यांनी येड्रावकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर पाळत सुद्धा ठेवली होती’, असा आरोप आव्हाड यांनी केला. Alert! पुढील 2 आठवड्यांत दिवसाला 1000 कोरोना बळी जातील; आरोग्य विभागाचा इशारा ‘रश्मी शुकला यांनी माफी मागून कारवाईचं पत्र परत मिळवलं होतं. हो आम्हाला मान्य आहे की, काही अधिकारी ओळखण्यात आम्ही कमी पडलो. जे अधिकारी भाजपचं ऐकत नाही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे. यापुढे काही टॅपिंग समोर आल्या तर त्याची जबाबदारी रश्मी शुक्ला याच असतील. रश्मी शुक्ला यांच्यामुळे अधिकारी अस्वस्थ झाले आहे’, अशी टीकाही आव्हाड यांनी केली. राज्यातील बँकेसह सरकारी बँका खाजगीकरणाच्या उंबरठ्यावर, काय म्हणाले RBI गव्हर्नर ‘आम्ही खूप मोठ्या मनाचे होतो ही चूक झाली की मान्य करत होते. आता चूक झाली की शिरच्छेद अशीच वागणूक ठेवणार असल्यावर कसे चालणार आहे. ही मानवी विकृती आहे’ असं परखड मतही आव्हाड यांनी व्यक्त केलं. तसंच, काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केला होता.
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2021
अजून पुरावे काय पाहिजेत.
‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपाबरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता’ असा दावा आव्हाड यांनी केला आहे.