दापोलीतील खळबळजनक घटना, एका चुकीमुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बसला हादरा!

दापोलीतील खळबळजनक घटना, एका चुकीमुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बसला हादरा!

दापोलीतील पहिल्याच कोरोनाबाधित महिलेसंदर्भात एक वेगळीच माहिती पुढे आली आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली,  07 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु,  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेला आयशोलेशन वार्डा ऐवजी चक्क पेड वार्डमध्ये उपचार करण्यात आला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दापोलीतील पहिल्याच कोरोनाबाधित महिलेसंदर्भात एक वेगळीच माहिती पुढे आली असून कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात देखील रुग्णालय प्रशासनाकडूनही कसे काम केले जाते याचा नमुना या उदाहरणामुळे पुढे आला आहे. मुंबई येथून पोटाची शस्त्रक्रिया केल्यानंतर काही काळाने ही महिला, तिचा मुलगा व सून हे रुग्णवाहिका करून मुंबई येथून 30 एप्रिल रोजी रात्री दापोलीत आले होते.

हेही वाचा - 3 डॉक्टरांनी उचललं टोकाचं पाऊल, रुग्णालयाच्या खिडकीतून मारली उडी आणि...

दापोली येथे आल्यावर या तिघांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना आयसोलेशन कक्षात न ठेवता पेड वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यानंतर या 65 वर्षीय महिलेवर उपचारही सुरू होते. तोपर्यंत या महिलेवर सर्वसाधारण रुग्ण म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर आणि नर्सेस व इतर कर्मचारी हे पीपीई किट परिधान न करताच जात होते.

मात्र,   या महिलेसंदर्भात शंका आल्याने तिचा स्वब घेण्यात आला व तो तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला. 5 मे रोजी या महिलेच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. महिलेवर उपचार करणाऱ्या सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या महिलेवर उपचार करणाऱ्या नर्स, डॉक्टर, शिपाई आणि संपर्कात येणाऱ्या नातेवाईकाचे स्वबचे नमुने घेण्यात आले आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज यांच्यासह 18 नेत्यांशी करणार चर्चा

कोविड 19 संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविडचा संसर्ग असलेल्या भागातून रुग्ण आल्यास त्याची तपासणी करून त्याचे अलगिकरण करणे बंधनकारक आहे. पण दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने आता त्याचा नाहक त्रास डॉक्टर व इतर  कर्मचाऱ्यांना आता सहन करावा लागत आहे.

ही महिला पेड वॉर्डमध्ये असताना तिला तिचे नातेवाईक व   ग्रामस्थही भेटून गेल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली असून आता या सर्वांना क्वारंटाइन करावे लागणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 7, 2020, 1:53 PM IST

ताज्या बातम्या