Home /News /mumbai /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज यांच्यासह 18 नेत्यांशी करणार चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज यांच्यासह 18 नेत्यांशी करणार चर्चा

राज्य सरकारकडून या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी होणार आहेत.

मुंबई, 07 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे.  मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यातही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 2 वाजता राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचं सहकार्य महत्वाचं असल्याने उद्धव ठाकरे आज दुपारी 2 वाजता राज्यातील 18 प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये SBI अलर्ट!बनावट बँक अधिकाऱ्यापासून सावधान,खातं रिकामं होण्याचं संकट यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच माकप, भाकप, एमआयएम आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांचाही या चर्चेत सहभाग असणार आहे. राज्य सरकारकडून या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राजकीय सर्वपक्षीय नेत्यांमध्ये संवाद होणार आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी पत्रक प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना विनंती आणि सल्ला दिला होता. राज यांनी दारू विक्री सुरू करण्याची मागणी केली होती, तेव्हा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली होती. हेही वाचा - मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये पोट भरण्यासाठी बेल्टनं मारहाण, वाचा काय घडलं तर दुसरीकडे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी आघाडी सरकारवर एकदाही टीकेची संधी सोडली नाही. त्याच पार्श्वभूमीवर आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काय चर्चा होणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या