मॉस्को, 07 मे : जगभरात कोरोनानं थैमान घातले आहे. रशियामध्येही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनोशी दोन हात करणाऱ्यासाठी सर्वात आघाडीवर असलेल्या डॉक्टरांवर मात्र खूप दबाव आहे. या दबावापोटी रशियातील तीन डॉक्टरांनी टोकाचं पाऊल उचललं. येथील डॉक्टरांनी रुग्णालयाच्या खिडकीतूनच उडी मारली यात दोन रशियन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर, एक गंभीर जखमी झाले आहेत.असे म्हटले जात आहे की प्रचंड कामाच्या ताणामुळे या डॉक्टरांनी ही पावले उचलली. रशियामध्ये सध्या 1 लाख 66 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर, 1500 लोकांचा मृत्यू झाला आहे. असे सांगितले जात आहे की रशियामध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना PPE आणि इतर वैद्यकीय उपकरणांची तीव्र कमतरता भासली आहे. अशा परिस्थितीत पुतिन सरकारवर टीका करणाऱ्या तीन डॉक्टरांनी रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारली. दरम्यान काही रिपोर्टमध्ये दोन डॉक्टरांनी त्यांच्या कामकाजाच्या परिस्थितीला विरोध केला होता. त्याच वेळी, तिसर्या डॉक्टरने आपल्या सहकारी कोरोना विषाणूची लागण झाल्याबद्दल सरकारला जबाबदार धरले होते, असे म्हटले आहे. वाचा- मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये पोट भरण्यासाठी बेल्टनं मारहाण, वाचा काय घडलं रिपोर्टनुसार, यातील दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे तर 1 अद्याप आयसीयूमध्ये आहेत. मॉस्कोच्या दक्षिणेला 500 किलोमीटरवर वरोनेझ प्रदेशातील रुग्णालयात 2 मे रोजी डॉक्टरांनी खिडकीतून उडी मारली. अलेक्झांडर सुलेपोव्ह असे एका डॉक्टरांचे नाव असून सध्या ते आयसीयूमध्ये आहे. सुलेपोव्ह यांनी त्यांच्या सहकाऱ्याला संसर्ग झाल्यानंतर सरकारविरुद्ध एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. मात्र, त्यानंतर प्रसिद्ध झालेला व्हिडीओ जुना असल्याचे सांगण्यात येत होते. वाचा- नितेश राणेंनी समोर आणला सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO,वार्डात मृतदेहच मृतदेह मुख्य म्हणजे, 25 एप्रिल रोजी एका डॉक्टरांनी सायबेरिया येथील रुग्णालयाच्या छतावरून खाली उडी मारली होती. डॉ. येलेना नेपोम्निशाच्या असे या डॉक्टरांचे नाव असून वेस्ट सायबेरियातील क्रास्नोयार्स्क येथील रूग्णालयाचे कार्यवाह प्रमुख होते. त्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याची भीती होती. नेपोम्निशाच्या यांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, आणखी एक डॉक्टरांचा असाच मृत्यू झाला होता. दरम्यान, हे तिन्ही अपघात, आत्महत्या की खून आहेत याबाबत शोध सुरू आहे. वाचा- फक्त 3 दिवसांत देशात 10000 नवीन रुग्ण, कोरोनाचा वाढणारा धक्कादायक ग्राफ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.