नवी दिल्ली, 10 डिसेंबर : अनेकदा डोकेदुखीची आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळं कशातही मन लागत नाही. डोकेदुखीवर औषधांचा वापर टाळायचा असेल, तर तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने त्यावर इलाज करू शकता. OnlyMyHealth ने दिलेल्या माहितीनुसार हे उपाय पूर्णपणे आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक पद्धतीचे आहेत, त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम होत नाहीत. याशिवाय सायनसचा त्रास, धुळीची अॅलर्जी, खोकला, सर्दी यापासूनही आराम मिळतो. आयुर्वेदाच्या मदतीने डोकेदुखी कशी बरी करू शकतो, याबाबत (How To Get Rid Of Headache) जाणून घेऊया.
डोकेदुखीसाठी आयुर्वेदिक उपाय
1. पुदिना
सायनस, ऍलर्जी किंवा सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर पुदिना वापरून बरी होऊ शकते. यासाठी तुम्ही पुदिन्याचा अर्क किंवा तेल वापरू शकता. पुदिन्याच्या तेलाने डोक्याला मालिश करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुदिन्याची पाने बारीक करून त्याची पेस्ट कपाळावर लावू शकता.
2. तुळशीची पाने
गॅस, सर्दी यामुळे डोकेदुखी होत असेल तर लगेच तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. तुळशीच्या पानांचा काढा बनवूनही तुम्ही पिऊ शकता.
3. पिंपळीचा वापर
आम्लपित्त किंवा खोकला आणि सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर तुम्ही पिंपळी वापरू शकता. पिंपळीच्या वापराने शरीरातील विषारी पदार्थ देखील काढून टाकले जाऊ शकतात.
हे वाचा - या देशात तरुणांना सिगारेट खरेदी करण्यास बंदी, सरकारने विक्रीवर आणले निर्बंध
4. गुळवेलचा वापर
अॅसिडिटीमुळे डोकेदुखी होत असेल तर गुळवेल ज्यूसचे सेवन करावे. तुम्ही तो पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. यामुळे अॅसिडिटीपासून आराम मिळेल आणि त्यामुळे डोकेदुखीपासूनही आराम मिळेल.
5. त्रिफळाचे सेवन
डोळ्यांच्या समस्यांमुळे डोकेदुखी होत असेल तर त्रिफळा चूर्ण घेतल्याने डोकेदुखीच्या समस्येवर मात करता येते. डोकेदुखीच्या बाबतीत, ब्राह्मी, लवंग, बडीशेप, आले, साखर कँडी यासारख्या गोष्टींचे सेवन करून देखील डोकेदुखीपासून आराम मिळवू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा
डोके दुखत असताना मसालेदार पदार्थ टाळा.
- ताण-तणावापासून दूर राहा.
- रोज व्यायाम करा.
- फायबर युक्त खा.
- डोळे तपासत राहा.
परंतु, तुमची डोकेदुखी 24 तासांपेक्षा जास्त काळ राहत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips