Home /News /crime /

क्लास बंक करून विद्यार्थ्यांचा पबमध्ये अश्लील डान्स; Video Viral झाल्यानंतर कॉलेजकडून कारवाई

क्लास बंक करून विद्यार्थ्यांचा पबमध्ये अश्लील डान्स; Video Viral झाल्यानंतर कॉलेजकडून कारवाई

होळकर कॉलेजमध्ये मुलांच्या पार्टीचा हा VIDEO सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    इंदूर, 10 डिसेंबर : इंदूरमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना (College Students) क्लास बंक करून पबमध्ये जाणं महागात पडलं आहे. पबमध्ये (Pub) मजा-मस्ती करीत असतानाचे काही अश्लील व्हिडीओ (Obscene Dance) आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर (Viral photos) हा प्रकार उघड झाला. हा प्रकार उघड झाल्यानंतर कॉलेजने तातडीने सर्वांना नोटीस पाठवली. हे सर्व विद्यार्थी इंदूर येथील होळकर सायन्स कॉलेजचे होते. विद्यार्थ्यांनी पबमध्ये फ्रेशर्स पार्टी ठेवली होती. मुख्य म्हणजे हे सर्व विद्यार्थी क्लास बंक करून पार्टी करायला गेले होते. कोणीही कॉलेजमधून पार्टीसाठी परवानगी मागितली नव्हती. एका विद्यार्थी लीडरला याबाबत कळताच त्याने कॉलेजमध्ये तक्रार केली. हे ही वाचा-लॉकडाऊनमुळे Online ची लागली सवय; 7 वीच्या मुलाचं कृत्य पाहून आई-वडील धक्क्यात! प्राचार्यांनी दिली नव्हती परवानगी... कॉलेजमध्ये ऑफलाइन क्लासेस तर सुरू झाले आहेत, मात्र कोरोनामुळे अन्य कार्यक्रम आदींवर बंदी आहे. कोणत्याही पद्धतीत सार्वजनिक कार्यक्रम आणि पार्टीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स पार्टीसाठी कॉलेज व्यवस्थापनाकडून परवानगी मागितीली होती. मात्र प्राचार्य डॉ. सुरेश सिलावट यांनी कोरोना प्रोटोकॉलचं कारण सांगत पार्टीसाठी नकार दिला. मात्र तरीही कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करून पार्टीची तयारी केली आणि पबमध्ये पार्टी केली. या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी मास्कशिवाय आणि आक्षेपार्ह अवस्थेत डान्स करीत असताना दिसले. एका विद्यार्थी नेत्याने या प्रकरणात कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली. याशिवाय पोलिसातही तक्रार केली. यानंतर मात्र कॉलेज व्यवस्थापकांनी व्हिडीओमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना नोटीस जारी केली. याशिवाय त्यांच्या पालकांनाही बोलावलं. कॉलेजने स्पष्ट केलं, पार्टी कॉलेज परिसरात झाली नसल्याने त्यांनी थेट कारवाई केली नाही. मात्र व्हिडीओ समोर आल्यानंतर कारवाई करणं आवश्यक होतं. पार्टी करण्याची परवानगी नसतानाही पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील काही विद्यार्थी पार्टीत सहभागी झाले. व्हिडीओ पाहून त्या विद्यार्थ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Indore News, Viral video.

    पुढील बातम्या