Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, एका फोनवर मिळणार रुग्णालयातील खाटांची माहिती

मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, एका फोनवर मिळणार रुग्णालयातील खाटांची माहिती

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील दृश्य

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील दृश्य

या वॉररूममधून कोरोनाबाधित रुग्णांना मुंबईत तुमच्या नजीकच्या रुग्णालयामध्ये किती खाटा उपलब्ध आहे याची माहिती दिली जाणार आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 07 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई पालिकेनं रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहे. पालिका प्रशासनाकडून प्रभागास्तरावर हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे जवळपास सर्वच रुग्णालयं खच्चाखच भरलेली आहे. वेळेवर खाटा उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने रुग्णांना योग्य माहिती देण्यासाठी प्रभाग स्तरावर उद्या 8 जूनपासून हेल्पलाईन सुरू करणार आहे.  यासाठी वेगळी वॉर रूम तयार करण्यात आली आहे. या वॉररूममधून  कोरोनाबाधित रुग्णांना मुंबईत तुमच्या नजीकच्या रुग्णालयामध्ये किती खाटा उपलब्ध आहे याची माहिती दिली जाणार आहे.

हेही वाचा -सोनू सूदसाठी भाजप नेता आला धावून, संजय राऊतांवर केला पलटवार

मुंबईत 24 वॉर्डमधील नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळल्यावर ती कोणत्या प्रकारची आहे. त्यानुसार, संबंधित रुग्णाला कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहे, याची माहिती दिली जाणार आहे.

प्रभारी सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली 24 वॉर्डसाठी या वॉररूममध्ये काम चालणार आहे. यामुळे वेगवेगवळ्या वॉर्डमधील रुग्णांना या हेल्पलाईनमुळे कुठल्या रुग्णालयात जायचे आहे, याबद्दल माहिती मिळणार आहे.

खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा या महापालिकेने घेतल्या ताब्यात

दरम्यान,  खासगी रूग्णालयामधील खाटांचे वितरण सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिक प्रभावीपणे होण्यासह या वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात; याकरिता सुयोग्य समन्वय साधण्यासाठी 5 सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांकडे गेल्याच महिन्यात मुंबईतील महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांच्या समन्वयाचे दायित्व देखील सोपविण्यात आले होते.

हेही वाचा -इतर आजारासाठी रुग्णालयात गेला पण, झाली कोरोनाची लागण; तरुण पत्रकारानं गमावला जीव

मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील सेवा सुविधांच्या अधिक प्रभावी समन्वयासाठी वर्ष 2007 च्या तुकडीतील सनदी अधिकारी मदन नागरगोजे व अजित पाटील, वर्ष 2008 च्या तुकडीतील राधाकृष्णन, 2009 च्या तुकडीतील प्रशांत नारनवरे आणि वर्ष 2011 च्या तुकडीतील सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती ही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे. तसेच एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयात करिता ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

First published:

Tags: BMC, Corona