मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /खानावळीसाठी घरी येत विवाहितेसोबत जुळवलं सूत; भिवंडीत अनैतिक संबंधातून चिमुरड्याचा काढला काटा

खानावळीसाठी घरी येत विवाहितेसोबत जुळवलं सूत; भिवंडीत अनैतिक संबंधातून चिमुरड्याचा काढला काटा

(File Photo)

(File Photo)

Murder in Bhiwandi: अनैतिक संबंधात (Immoral relationship) अडसर ठरत असल्यानं भिवंडीतील आठ वर्षीय चिमूरड्याचं अपहरण (Kidnapping) करून त्याची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे.

भिवंडी, 17 जुलै: अनैतिक संबंधात (Immoral relationship) अडसर ठरत असल्यानं भिवंडीतील आठ वर्षीय चिमूरड्याचं अपहरण (Kidnapping) करून त्याची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अवघ्या अठरा तासांत हत्येचा उलगडा केला असून आरोपीला गजाआड (Accused arrest) केलं आहे. संबंधित आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं चिमूरड्याची हत्या केल्याचंही त्यानं कबुल केलं आहे. या घटनेचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

जितेंद्र मधेशिया असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. संबंधित आरोपी भिवंडी तालुक्यातील कारीवली गावातील एका कुटुंबाच्या घरी खानावळीसाठी येत होता. दरम्यान आरोपीचं संबंधित कुटुंबातील विवाहित महिलेशी सूत जुळलं. घरी जेवणासाठी आल्यानंतर तो अनेकदा विवाहित महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करत असे. दरम्यान, घरी जेवणासाठी येणाऱ्या व्यक्तीचं आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती आठ वर्षाच्या मुलाला मिळाली. यानंतर मुलानं याबाबतची माहिती आपल्या वडिलांना सांगितली.

हेही वाचा-31 वर्षीय पॉर्न स्टारच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ; गाडीमध्ये आढळला मृतदेह

बायकोच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्यानंतर मृत मुलाच्या वडिलांनी आरोपी जितेंद्र मधेशिया याच्याशी बाचाबाची करत त्याची खानावळ बंद केली. हाच राग मनात धरून आरोपी जितेंद्र मधेशिया यानं अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या आठ वर्षीय मुलाचं अपहरण करत त्याची गळा आवळून हत्या केली आहे. बराच वेळ झाला तरी मुलगा सापडत नसल्यानं मृत मुलाच्या वडिलांनी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.

हेही वाचा-114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची हत्या; पायावर लिहिलेला मजकूर वाचून पोलीस हैराण

शुक्रवारी पहाटे आठ वर्षीय मुलाचा मृतदेह कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपी जितेंद्र मधेशिया याला अटक केली आहे. आरोपीनं खेळण्याच्या बहाण्यानं चिमूरड्याला चौथ्या मजल्यावर नेवून त्याची गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. अवघ्या अठरा तासांच्या आत भोईवाडा पोलिसांनी हत्येची उकल केली आहे. आरोपी जितेंद्र मधेशियाला न्यायालयानं 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai, Murder