Home /News /crime /

114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; आरोपीनं पायावर लिहिलेला मजकूर वाचून पोलिसही गोंधळले

114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; आरोपीनं पायावर लिहिलेला मजकूर वाचून पोलिसही गोंधळले

एका व्यक्तीनं 13 वर्षाच्या चिमुकलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. त्यानं चिमुकलीवर धारदार शस्त्रानं 114 वेळा वार केले

    वॉशिंग्टन 17 जुलै : हृदय पिळवटून टाकणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीनं 13 वर्षाच्या चिमुकलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. त्यानं चिमुकलीवर धारदार शस्त्रानं 114 वेळा वार केले (Minor Boy Stabbed 13 Years Old Girl 114 Times). इतकंच नाही तर या हत्येनंतर मुलीच्या पायावर कर्मा असं लिहिण्यात आलं. ही घटना अमेरिकेच्या (America) फ्लोरिडामधील (Florida) आहे. Exclusive: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी होणार 'ग्रॅज्युएट', पाहा BA ची मार्कशीट द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, तपासात असं समोर आलं आहे, की आरोपीनं या हत्येआधी काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रांजवळ म्हटलं होतं, की त्याला चाकूनं कोणालातरी मारायचं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे घटनेतील आरोपीही अल्पवयीन आहे, त्याचं वय केवळ 14 वर्ष आहे. हत्येनंतर कोणीतरी मृत ट्रिस्टिन बॅली हिच्या पायावर निळ्या रंगाच्या शाईनं कर्मा असं लिहिलं. तर, दुसऱ्या पायावर स्मायली काढली. हे कोणी लिहिलं याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी फ्लोरिडामधील एका तलावाजवळ झाडाच्या खालून पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आरोपीनं आपल्या मित्रांना सांगितलं होतं, की एक दिवस तो कोणालातरी याच झाडाखाली आणून मारणार आहे. तो एकटाच हातात चाकू घेऊन कोणालातरी मारण्याचा सराव करत असे. 31 वर्षीय पॉर्न स्टारच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ; गाडीमध्ये आढळला मृतदेह मृत चिमुकली चिअरलीडर होती. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस सध्या आरोपी आणि त्याच्या ओळखीच्या लोकांची चौकशी करत आहेत. पोलीस या गोष्टीची शोध घेत आहेत, की त्यानं पीडितेला का मारलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या