सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणावले भूकंपासारखे हादरे, नागरिकांमध्ये भीती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणावले भूकंपासारखे हादरे, नागरिकांमध्ये भीती

या हादऱ्यांमुळे नागरीक घराबाहेर आले असून अनेक जण घरांमध्ये जाण्यासही घाबरत आहेत. त्यातच पावसाचं संकट असल्याने नागरीकांची चिंता वाढली आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग 14 ऑक्टोबर: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी (14 ऑक्टोबर) संध्याकाळी भूकंपासारखे हादरे जाणवले. सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे येथे मोठा आवाज आला व हादरे बसल्याचे जाणवले असं स्थानिक नागरीकांनी सावंतवाडीच्या तहसीलदारांना दूरध्वनी वरून सांगितल्याची माहिती आहे. तसेच का रीवडे इथल्या उपसरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार कारीवडे धवडकी भागात भूकंप सदृश धक्का जाणवला मात्र कोणतीही नुकसानी नाही अशी माहिती कारिवडे इथल्या तलाठ्यांनी दिली आहे. कोकणात काही भागात याआधीही अशाच प्रकारचे हादरे जाणवले आहेत.

कोरोनाचं संकट, पावसाची भीती  त्यात असे हादरे जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा नेमका भूकंपच आहे का आणि त्याची तीव्रता किती आहे याची अधिकृत माहिती रात्री उशीरापर्यंत मिळू शकली नाही.

या हादऱ्यांमुळे नागरीक घराबाहेर आले असून अनेक जण घरांमध्ये जाण्यासही घाबरत आहेत. त्यातच पावसाचं संकट असल्याने नागरीकांची चिंता वाढली आहे.

राज्यात पावसाचं संकट

परतणाऱ्या पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. लातूर जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची दैना झाली आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी शिवारातला तेरणा नदीचे पात्र फुटले आणि शेतात पाणी शिरलं. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवलं होतं पावसाच्या पाण्यात हे सोयाबीन वाहून गेलं. नंतर शेतकऱ्यांनी पावसातून दोरी बांधून धाडसाने ते परत आणलं.

सध्याचा काळ हा सोनायबीनच्या काढणीचा आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवलंय तर अनेकांचं काढणीला आलं आहे. अनेकांच्या शेतात झाडांनाच कोबं फुटली. पावसाच्या शक्यतेमुळे काही शेतकऱ्यांनी मेनकापडात सोयाबीन झाकून, बांधून ठेवलं होतं. मात्र पाऊसच एवढा झाला की सगळ्या शेतामध्ये पाणी पाणी झालं. त्यात सोयाबीन वाहून जायला लागलं.

डोळ्यासमोर आपलं स्वप्न वाहून जात असल्याने शेतकरी हवालदील झाले. मात्र त्यांनी हिंम्मत हारली नाही. दोरखंडाच्या साह्याने पाण्यात उतरून मोठ्या धाडसाने ते सोयाबीन काठावर आणलं.

कोरोनाच्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना पावसानेही तडाखा दिला आहे. खरीपाचं पीक हातातून गेलं आता रब्बीही जाण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

पुणे सोलापुर हायवे पावसामुळे बंद केला असुन उजनी धरणाचे पाणी भिगवण,डाळज,पळसदेव,इंदापुर येथे हायवेवर आले असल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबविली असुन कोणीही सोलापुर दिशेने प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. जर पावसाचे प्रमाण वाढले तर मुठा नदीत विसर्ग चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातही हाय अलर्ट देण्यात आला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 14, 2020, 11:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading