मुंबई, 17 जुलै: मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईला (Mumbai) मुसळधार पावसानं (Heavy rainfall) झोडपून काढलं आहे. मुंबईतील अनेक ठिकाणचे रस्ते तुंडुंब भरल्यानं परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक रस्त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे विमान उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात येत आहेत. आजही मुंबईसह उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनचं मुंबई अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात मान्सूननं कमबॅक करत अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारली होती. पण पावसाचा जोर एक आठवडाभरही टिकला नाही. आता पुन्हा राज्यात मान्सून मंदावताना दिसत आहे. पुढील काही दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हेही वाचा- कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट! संसर्गजन्य Monkeypox चा रुग्ण आढळल्यानं खळबळ आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित तीन जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच गोवा किनारपट्टीवर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन तासांत ठाण्यासह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
Nowcast Warning issued at 1600 Hrs IST dated 17-07-2021:
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 17, 2021
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Thane, Ratnagiri, Sindhudurg during next 3 hours.
-IMD MUMBAI
हेही वाचा- सतर्क रहा! लस घेतल्यानंतर ही लक्षणं आढळल्यास जराही दुर्लक्ष करु नका काय असेल मुंबई- पुण्याची स्थिती? मागील दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्रीपासून सलग दोन दिवस मुंबईत तर पावसानं धूमशान घातलं होतं. आज मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्र, घाट परिसराला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून मुंबईसह ठाणे परिसरात अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.