जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Sharad pawar : कुणाला जायचं असेल तर..., शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

Sharad pawar : कुणाला जायचं असेल तर..., शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

शरद पवार यांची पत्रकार परिषद

शरद पवार यांची पत्रकार परिषद

Sharad Pawar PC Live : अशी परिस्थिती असेल तर अध्यक्षपदावर थांबून कंट्रोल केले जाऊ शकते, यावर लक्ष दिलं पाहिजे. इतकं मला तरी समजतं,

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई, 05 मे : ‘**कुणाला जायचं असेल, कोणत्याही पक्षात जायचं असेल तर कुणाचं नुकसान तर नाही. यासाठी नेतृत्वाने थांबण्यासाठी सांगण्याची काही आवश्यकता नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मागील 4 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठकांचं सत्र सुरू होतं अखेरीस आज या राजीनामानाट्यावर पडदा पडला. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवृत्त होण्याची घोषणा मागे घेतली. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ‘कुणाला जायचं असेल, कोणत्याही पक्षात जायचं असेल तर कुणाचं नुकसान तर नाही. यासाठी नेतृत्वाने थांबण्यासाठी सांगण्याची काही आवश्यकता नाही. अशी परिस्थिती असेल तर अध्यक्षपदावर थांबून कंट्रोल केले जाऊ शकते, यावर लक्ष दिलं पाहिजे. इतकं मला तरी समजतं, त्यामुळे आमच्या पक्षात असं काहीही नाही, असं शरद पवार स्पष्ट म्हणाले. आजच्या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित आहे असं विचारले असता, शरद पवार म्हणाले की, ‘पत्रकार परिषदेला सर्वजण उपस्थित असणंच गरजेचं नाही, नेत्यांची सर्व फळी असतेच असं नाही’

News18लोकमत
News18लोकमत

राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. सामना, ज्यांनी लिहिलं त्यांना विचारावं, अशी कोणतीही माहिती मला नाही, असा टोलाही पवारांनी राऊतांना लगावला. ‘माझी जबाबदारी नेमकी कशी होती, विश्वासात घेणं, आणि मी निर्णय घेताना नेत्यांना विश्वासात घेतलं नाही याची मला खंत आहे. माझ्यासोबत बसलेले सगळे बॅकअपच आहेत, नव्या कुणालातरी संधी मिळावी म्हणून मी प्रयत्नशील होतो पण त्याला रोखलं. मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन, उदा. जिल्हा लेव्हलसाठी, राज्यपातळीसाठी नेतृत्त्वाची संधी देण्याता मी प्रयत्न करेन, असं सूचक विधानही पवारांनी केलं, भाकरी फिरवायला गेलो होते. पण भाकरी थांबली ना, असंही शरद पवार म्हणाले. मी राजीनामा दिला, महाविकास आघाडीवर माझ्या निर्णयाचा काही परिणाम होणार नाही, चिंतेचं कारण नाही, आम्ही एकत्र काम करू अजून मेहनत करू. माझ्या निर्णयानंतर मविआचं काय होईल याचा विचार केला होता, मला असं वाटतं की, आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत. एकत्र काम करू जो काही लोकांना पर्याय द्यायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असंही पवार म्हणाले. (पवारांचा राजीनामा स्क्रिप्टचा भाग आहे का? राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर) 2 मे 2023 रोजी लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मी सगळ्याच जबाबदारीतून मुक्त व्हावं अशी माझी इच्छा होती. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक माझ्यावर प्रेम आणि निष्ठा असणारे कार्यकर्ते चाहते यांनी संघटित होऊन एकमुखानं मला आवाहन केलं. विशेषतः महाराष्ट्रातून विविध राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्तेही भेटले, मी ही जबाबदारी पुन्हा घ्यावी ही त्यांनी इच्छा व्यक्त केली. मी अध्यक्षपद सोडू नये म्हणून सगळ्यांनी विनंती केली. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय या सगळ्यांचा विचार करू मी पुन्हा सरत शेवटी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं पवार म्हणाले. शरद पवार यांचं संपूर्ण पत्र दिनांक २ मे, २०२३ रोजी लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनतर भी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती. परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. (Sharad Pawar : शरद पवारांच्या सर्वात महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चा) ‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या याचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.. आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद ।

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात