...तर मुंबईत पुन्हा लागू होऊ शकतं Lockdown, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

...तर मुंबईत पुन्हा लागू होऊ शकतं Lockdown, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

मुंबईत पुन्हा एकदा ट्राफिक जाम अनुभवायला मिळालं. वाहनांची प्रचंड गर्दी झाली. लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले.

  • Share this:

मुंबई 10 जून:  जवळपास अडीच महिन्यांनंतर मुंबई आणि राज्यातले व्यवहार पुन्हा सुरळीत करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी मुंबईत होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोक अनावश्यक घराबाहेर पडत राहिले, गर्दी करत राहिले तर लॉकडाऊनमध्ये दिलेली सुट परत घ्यावी लागले. म्हणजेच पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी आज दिलेत.

8 जून पासून जवळपास सर्वच व्यवहारांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गेली दोन दिवस मुंबईत पुन्हा एकदा ट्राफिक जाम अनुभवायला मिळालं. वाहनांची प्रचंड गर्दी झाली. लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

त्यात सगळ्यात जास्त चिंता आहे ती मुंबईची. त्यामुळे सरकार त्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

मुंबईत मंगळवारी 1015 नवे कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यामुळे एकूण 50 हजार 878 एवढी झाली आहे. तर 58 मृत्यूची नोंद झाली होती.  मृत्यूची एकूण संख्या 1758 एवढी झाली आहे. तर सध्या मुंबईतील 775 चाळी आणि झोपडपट्टी या कंन्टेंमेंट झोनमध्ये आहेत. तर 4071 इतक्या इमारती सध्या (सक्रिय) सील करण्यात आल्या आहेत.

राज्यात उद्याच दाखल होणार मान्सून; कुठल्या भागात कधी पडणार सरी?

Unlock 1.0 चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा उपनगरीय लोकल वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडे उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांदा ही मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करावी असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. मुंबई, पुणे आणि राज्यभरात या आठवड्यापासून निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे सर्व दुकानं आणि खासगी ऑफिसेस त्या त्या ठिकाणच्या नियमांनुसार उघडण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोनावर प्रभावी ठरलेलं ‘हे’ औषध लवकरच भारतात होणार तयार!

त्यामुळे आता रस्ता वाहतुकीवर ताण आलेला स्पष्ट दिसतो आहे. मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. पहिल्या लॉकडाऊननंतरच मुख्यमंत्री ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सुरू झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. पण त्या वेळी फक्त अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्याचा निर्णय झाला.

संपादन - अजय कौटिकवार

 

 

 

First published: June 10, 2020, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading