Home /News /national /

कोरोनावर प्रभावी ठरलेलं ‘हे’ औषध लवकरच भारतात होणार तयार!

कोरोनावर प्रभावी ठरलेलं ‘हे’ औषध लवकरच भारतात होणार तयार!

कोरोनावर रामबाण औषध अजुन सापडलेलं नाही. जगभर त्यावर संशोधन सुरू आहे. मात्र काही औषधं कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरल्याचं आढळून आलं आहे.

    नवी दिल्ली 10 जून: कोरोनावर रामबाण औषध अजुन सापडलेलं नाही. जगभर त्यावर संशोधन सुरू आहे. मात्र काही औषधं कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरल्याचं आढळून आलं आहे. त्यातलं एक म्हणजे रेमेडिसिव्हीर (Remdesivir). गिलीड सायन्स (Gilead Sciences) या अमेरिकन कंपनीने भारतातल्या चार कंपन्यांसोबत जेनरिक औषधाच्या उत्पादनाचा करार केला आहे. मात्र त्यांना केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांकडून अजून परवानगी मिळाली नाही. ती परवानगी लवकरच असं केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. हेटेरो, ज्युबिलेंट लाईफ सायन्स लिमिटेड, सिप्ला लिमिटेड आणि माइलान एनव्ही या पाच कंपन्यांनी रेमेडिसिव्हीर च्या उत्पादनाची परवानगी मागितली आहे. CDSCO ही केंद्र सरकारची संस्था त्यावर फास्ट ट्रॅक पद्धतीने विचार करत असून लवकरच ही परवानगी मिळेल असं सांगण्यात आलं आहे. आता कंपन्यांना ड्रग कंट्रोलर जनरलच्या मार्केटींग मंजूरीच्या प्रतीक्षा  आहे. भारतीय बाजारपेठेत  रेमेडिसिव्हिर हे  औषध उपलब्ध होण्यास थोडा वेळ लागू शकेल. भारतात कोविड -19च्या उपचारादरम्यान  रेमेडिसिव्हिरच्या  वापरासाठी मान्यता देण्यात आली होती. मुंबई लोकल सुरू करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केली मागणी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार  या पाच कंपन्यांकडून अभ्यास आणि चाचणी परवान्याशी संबंधित कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. आरोग्य विभागाचा मोठा खुलासा, स्थलांतरित मजुरांमुळे 72% वाढले कोरोनाबाधित रुग्ण दरम्यान, महाराष्ट्र सरकार बांगलादेशातून 10,000  रेमेडिसिव्हिर औषधांचे डोस खरेदी करीत आहे. स्थानिक कंपन्यांचे म्हणणे आहे की औषधे तयार करण्यासाठी कच्च्या मालापासून ते साठा करण्यासाठी सर्व काही आपल्याकडे आहे, परंतु कंपन्यांना औषधे तयार करण्याची  मान्यता नाही. ती मान्यता मिळाली तर औषध स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या