मुंबई 09 सप्टेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (CM Uddhav Thakeray) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे फोन आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर बुधवारी प्रतिक्रिया व्यक्त केली. मलाही धमक्यांचे फोन येत होते, मात्र मी याला जास्त महत्त्व देत नाही असं त्यांनी सांगितलं. ‘मला यापूर्वी ही अनेक धमक्यांचे फोन आले होते. मी त्यावेळीही त्याला गंभीरपणे घेतले नाही आणि आजही गंभीरपणे घेत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. तसंच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतःला किती धमक्यांचे फोन आले त्याची यादी दाखवली आहे. त्यामुळे यावर आणखी काय बोलावे, असं मिश्किल उत्तरही शरद पवार यांनी दिले. कंगनाच्या वादावरही त्यांनी मत व्यक्त केलं. या वादावर त्यांनी सेनेला सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘शिवसेना आता संपली आहे’, कंगना प्रकरणावरून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल ‘पोलीस दलच मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षेसाठी काम करत आहे आणि हे सामान्य जनतेला माहीत आहे. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी जनता त्याला फारसा गंभीरपणे घेत नाही’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर, ‘मुंबईतील लोकं आणि महाराष्ट्राची जनताही सुज्ञ आहे. जनतेवर अशा लोकांच्या वक्तव्यामुळे काही परिणाम होतो का हे पाहणे महत्त्वाचे असते. पण लोकं अशा वक्तव्य आणि लोकांना गंभीरपणे घेत नाही. त्यामुळे तुम्हीही अशा लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नका’, असा सल्ला शरद पवार यांनी शिवसेनेला आणि सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. असं अधिवेशन घ्यायचं असेल तर ‘मातोश्री’च्या गच्चीवर घ्या,नारायण राणेंची जहरी टीका ‘मुंबईत अनेक बांधकाम अवैध असतील, ही कारवाई केल्याने विनाकारण बोलण्याला संधी उपलब्ध करून देणे आहे. अधिकारी यांनी असा निर्णय का घेतला बघावं लागेल’, असंही शरद पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.