Home /News /entertainment /

‘शिवसेना आता संपली आहे’, कंगना प्रकरणावरून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

‘शिवसेना आता संपली आहे’, कंगना प्रकरणावरून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

'शिवसेनेची स्थितीही काँग्रेससारखीच झाली आहे. आपली सत्ता वाचविण्यासाठीच ते हे करत आहे.'

    शिमला 09 सप्टेंबर: कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेमधले (Shivsena) आरोप-प्रत्यारोपांनी आता गंभीर वळण घेतलंय. कंगनाने खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर टीका केल्याने या वादाने नवं वळण घेतलं आहे. कंगना ही मुळची हिमाचल प्रदेशची असल्याने तिथले भाजपचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ठाकूर म्हणाले, ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन झाली ती शिवसेना आता संपली असून त्या पक्षाची जमिनीपासून नाळ तुटली आहे. शिवसेनेची स्थितीही काँग्रेससारखीच झाली आहे. आपली सत्ता वाचविण्यासाठीच ते हे करत असल्याची टीकाही ठाकूर यांनी केली. हिमाचल प्रदेश सरकारने कंगनाला सुरक्षा पुरवली आहे. तर केंद्र सरकारनेही कंगनाला सुरक्षा दिली आहे. मुंबईत काय घडलं? अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)च्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे इथं असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावरचं काही बांधकाम पालिकेच्या कामगारांनी पाडलं. अतिक्रमण आणि नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. हेरगिरीसाठी चीनने भारतात पाठवले याक? Indian Armyचं खास ऑपरेशन! याठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला. बेकायदेशील बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला 24 तास उलटल्यावनंतर पालिकेकडून तोडक कारवाई होत आहे. ही कारवाई सुरू झाल्यानंतर कंगनाच्या वकिलांनी हायकोर्टातून या कारवाईला स्थगिती मिळवली आहे. कंगनाच्या ऑफिसवर कारवाई सुरू झाल्याने मुंबईत येताच तिनं उच्च न्यायालयात धाव घेतली. कंगनाच्या वकिलांनी घटनास्थळी पोहोचून पालिकेच्या अधिकाऱ्याला कायदेशीर कागदपत्र दाखवलं. तसंच, बांधकाम हे अधिकृत असल्याचा दावाही केला आहे. खुद्द कंगनाने ही ट्वीट करून बांधकाम अधिकृत असल्याचा दावा केला आहे. जन्मत:च मुलगी आली कोरोना पॉझिटिव्ह; जन्मदात्यांनी रुग्णालयातच सोडून काढला पळ कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेनं आपल्या ऑफिसची काय अवस्था केली हे कंगनाने व्हिडीओ शेअर करत दाखवलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Kangana ranaut, Uddhav thackeray

    पुढील बातम्या