Home /News /maharashtra /

असं अधिवेशन घ्यायचं असेल तर 'मातोश्री'च्या गच्चीवर घ्या, नारायण राणेंची जहरी टीका

असं अधिवेशन घ्यायचं असेल तर 'मातोश्री'च्या गच्चीवर घ्या, नारायण राणेंची जहरी टीका

मराठा आरक्षणाला (maratha reservation) स्थगिती दिली आहे. याला राज्य सरकारच जबाबदार आहे

मुंबई, 9 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं शिक्षण आणि नोकरीतील मराठा आरक्षणाला (maratha reservation) स्थगिती दिली आहे. याला राज्य सरकारच जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नव्हती. कारण सरकारकडून एकही नावाजलेला वकील नव्हता. सरकारनं सगळे नात्यागोत्यातले उभे केले होते. नुकतच विधानसभेचं पावसाळी अधिवेशन झालं त्यात थोडी चर्चा करणं आवश्यक आहे. असं अधिवेशन घ्यायचं असेल तर 'मातोश्री'च्या गच्चीवर घ्या, अशा शब्दांत नारायण राणे (Narayan Rane)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. हेही वाचा...'जलयुक्त' नव्हे तर 'झोलयुक्त' शिवार! 'मी लाभार्थी'खर्च भाजपकडून वसूल करा नारायण राणे म्हणाले, माझ्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची दोघांचीही भाषणं आहेत. सत्तारूढ लोकांनी हैदोस घातला. वारंवार सभागृहं बंद पडली आणि 11/12 बिलं चर्चेशिवाय मंजूर करून घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं. त्यांना राज्यातील समस्या मांडल्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलं नाही. लोकांच्या भयावह परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री काहीही बोलले नाही. एवढ्या मोठ्या विदर्भााला फक्त 16 कोटी दिले, 1600 कोटी दिले असते तरी ते पुरले नसते. कोकणात मदतीचा एकही रुपया आलेला नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे? -राज्यातील एखाद्या गावचा सरपंचपही मुख्यमंत्र्यांपेक्षाही चांगला बोलला असता -कोरोनाकरता हात धुवा या काय मुख्यमंत्र्यांनी द्यायचा सूचना आहेत का ? -कोरोनाच्या सुरुवातीला पण हात धुवा आणि आत्ताही धुवा असं मुख्यमंत्री सांगताहेत -असं अधिवेशन घेण्यापेक्षा नसतं घेतलं तर बरं झालं असतं -असं अधिवेशन घ्यायचे असेल तर मातोश्रीच्या गच्चीवर घ्या -सध्या कोरोनामुळे लोकं भयभीत आहेत -मुंबई आमची म्हणायचं आणि यात कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू झाला ते पाहा - लोकांना पेटवायचं काम हे करतायंत -कोरोनावर राज्य सरकारने काही पाऊलं उचलणे आवश्यक होतं -आता या परिस्थितीतून आता इश्वरच वाचवू शकेल -कोरोनामुळे सगळे उद्योगधंदे कोलमडलेत यावर हे सरकार काही बोलत नाहीये -मातोश्रीवर हल्ल्याची धमकी कोणी दिली ? -मुंबई पोलिस फोन कुठून आला हे माहिती कळू शकणारी मशिनरी आहे -सुशांतचं प्रकरण झाल्यावर हा फोन आल्याची बातमी आली -साहेब होते यांना कोणी मारणार नाही -मलाही एक फोन आला -तो म्हणाला आपल्या माणसाला मदत करायची करा, म्हणजे मातोश्रीला वाचवा -दाऊद यांना कशाला फोन करेल त्यात काही नाहीये -आता काही करायला काही राहिलंय काय ? -ही तर पुळचट माणसं ही कधी दाऊदचं नावही घेत नाहीये -कंगना आपल्या मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? -सुशांतची हत्या आहे, दिशा सालियनवर बलात्कार करुन खूप करण्यात आला -शिवसेना जन्माला आली त्यावेळेस 60 टक्के मराठी माणसं होती आणि आता 30 टक्के आहेत. आता मराठी माणसांचा -हक्काचा एकही मतदारसंघ नाही, सेनेचं पाप आहे. -कंगनाने खरोखर काही चुकीचं विधान केलं असेल तर मग कराना कायदेशीर कारवाई -संजय राऊतने येऊन दाखवा अशी धमकी आली, ती आली घरी गेली शिवसेनेचं नाक कापलं -मी उद्धव आणि साहेबांचे कपडे काढेल असं संजय राऊत म्हणाले होते -उद्धव ठाकरेंचं कल्याण डोंबिवलीचं भाषण - पोलिसांना मी सांगेल की भाजपची धुणी भांडी करु नका -मग या पोलिसांच्या गराड्यात कशाला फिरता ? -मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंज-यात का बसलेत ? -सुशांतच्या केसमध्ये असं काय आहे की ठाकरे कुटुंबीय का भयभीत आहेत ? -डिनो मोरियाला येऊ देत ना सीबीआयच्या कक्षेत -मराठी माणूस तडीपार झाला आणि यांचे दोन बंगले झाले.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maratha reservation

पुढील बातम्या