मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कधीकाळी होती थेट 'मातोश्री'वर एंट्री, रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहे कोण?

कधीकाळी होती थेट 'मातोश्री'वर एंट्री, रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहे कोण?

कधीकाळी 'मातोश्री'वर प्रसाद कर्वे यांचा थेट संपर्क असल्याने शिवसेनेत त्यांच्या शब्दाला खूप वजन होते.

कधीकाळी 'मातोश्री'वर प्रसाद कर्वे यांचा थेट संपर्क असल्याने शिवसेनेत त्यांच्या शब्दाला खूप वजन होते.

कधीकाळी 'मातोश्री'वर प्रसाद कर्वे यांचा थेट संपर्क असल्याने शिवसेनेत त्यांच्या शब्दाला खूप वजन होते.

  • Published by:  sachin Salve

दापोली, 02 ऑक्टोबर : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab), शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांचे दापोली (dapoli) तालुक्यातील मुरुड येथील बंगले बेकायदेशीर असल्याची माहिती शिवसेनेचे (shivsena) मंत्री रामदास कदम (ramdas kadam) व प्रसाद कर्वे (prasad karve) यांनीच दिली असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. रामदास कदम, किरीट सोमय्या आणि प्रसाद कर्वे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

प्रसाद उर्फ बाळा कर्वे हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. कधीकाळी मातोश्री वर प्रसाद कर्वे यांना थेट प्रवेश दिला जात होता. बाळा कर्वे असे ओळख असलेले प्रसाद कर्वे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुजारी म्हणून ओळखले जायचे. काही वर्ष मुंबईत भडजी म्हणून काम केल्यानंतर प्रसाद कर्वे दापोलीत आले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मुळगाव  मुरुड येथील रहिवासी असलेले प्रसाद कर्वे सध्या वास्तव्यास दापोलीत आहेत.

मुंबईचा आणखी एक खराब सिझन, रोहितला त्रास देणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती

गेली अनेक वर्ष पुजारी म्हणून त्यांची ओळख आहे. अलीकडे त्यांना सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या पूजेवर सुरू आहे. समाज हितासाठी ते गेले अनेक वर्ष माहितीच्या अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखली जात आहेत. आजपर्यंत त्यांनी 13000 माहिती अधिकाराचा अर्ज केला आहे, त्यांच्या माहिती अधिकारामुळे अनेक लोकांना न्याय सुद्धा मिळाला आहे.

कधीकाळी 'मातोश्री'वर प्रसाद कर्वे यांचा थेट संपर्क असल्याने शिवसेनेत त्यांच्या शब्दाला खूप वजन होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. परंतु अलीकडे ते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्ती म्हणून  ओळखले जातात. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बेकायदेशीर सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या काही हॉटेल व्यवसायिकांची माहितीच्या अधिकारात त्यांनी माहिती मागवली होती.

ITAT Recruitment: आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई इथे 45 जागांसाठी भरती

प्रसाद कर्वे यांनीच किरीट सोमय्या यांना माहिती पुरवण्याच्या काही क्लिप व्हायरल झाल्याने अचानक प्रसाद कर्वे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी त्यांचा झालेला संवाद हा सुद्धा व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पालकमंत्री अनिल परब व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर बंगल्या संदर्भातली संपूर्ण माहिती प्रसाद कर्वे यांनीच पुरवली असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. त्यामुळे प्रसाद कर्वे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

First published: