मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेत भूकंप? अनिल परबांची कार्यालयं तोडण्याची ऑर्डर आली, रामदास कदम म्हणाले 'व्हेरी गुड', audio क्लिप व्हायरल

शिवसेनेत भूकंप? अनिल परबांची कार्यालयं तोडण्याची ऑर्डर आली, रामदास कदम म्हणाले 'व्हेरी गुड', audio क्लिप व्हायरल

'रामदास कदम हे महाविकास आघाडीतील सूर्याजी पिसाळ असून त्यांच्यावर पक्षप्रमुखांनी कारवाई करावी, त्यांच्या कृत्याने महाविकास आघाडीची प्रतिमा मालिन झाली आहे'

'रामदास कदम हे महाविकास आघाडीतील सूर्याजी पिसाळ असून त्यांच्यावर पक्षप्रमुखांनी कारवाई करावी, त्यांच्या कृत्याने महाविकास आघाडीची प्रतिमा मालिन झाली आहे'

'रामदास कदम हे महाविकास आघाडीतील सूर्याजी पिसाळ असून त्यांच्यावर पक्षप्रमुखांनी कारवाई करावी, त्यांच्या कृत्याने महाविकास आघाडीची प्रतिमा मालिन झाली आहे'

  • Published by:  sachin Salve

रत्नागिरी, 02 ऑक्टोबर :  रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यासह इतर नेते अडचणीत सापडले आहे. पण, अनिल परब आणि सचिव मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांच्याविरोधातील पुरावे हे शिवसेनेचे (shivsena ) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (shivsena leader Ramdas Kadam) यांनी त्यांचे पीए प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somiya) यांना दिल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम (sanjay kadam) यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आज खेडमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ऑडिओ क्लिपसह पुरावे सादर केले आहे.

" isDesktop="true" id="612386" >

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील रिसॉर्ट आणि बंगल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पीए प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे.

कदम यांनी प्रसाद कर्वे, रामदास कदम यांचे आणि किरीट सोमय्या यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील माध्यमांसमोर सादर केले आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये भाई आज किरीट सोमय्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर कदम म्हणाले की, 'वाह क्या बात है' असं म्हटलं आहे. वेगवेगळ्या संभाषणाच्या अशा ७ ते ८ ऑडिओ क्लिप देण्यात आल्या आहे. मात्र, ही क्लिप रामदास कदम यांचीच आहे का, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

पवारांनी गाठल MLA निलेश लंकेंच घर, छोट्या खोलीत खुर्चीवर बसून कुटुंबाची विचारपूस

मात्र, 'रामदास कदम हे महाविकास आघाडीतील सूर्याजी पिसाळ असून त्यांच्यावर पक्षप्रमुखांनी कारवाई करावी, त्यांच्या कृत्याने महाविकास आघाडीची प्रतिमा मालिन झाली आहे, आघाडीला अडचणीत आणण्याचे काम त्यांनी केल्याचे संजय कदम आणि वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले  आहे.

तर, हे कोकणाचं दुर्दैव आहे. खरंतर कोकणातील पर्यटनाला हा घाला घालण्याचे काम आहे. अशा या उद्योगामुळे नवीन जी काही गुंतवणूक आहे ती होत नाही. किरीट सोमय्यांना कुणी माहिती पुरवली होती, याची माहिती मी दिली आहे. त्यांच्याकडे ते असतात, जेवणासाठीही थांबत असतात. हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. परब हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आहे.  परब यांच्या वास्तूला हात घालणे म्हणजे, मुख्यमंत्र्यांपर्यंत याची दखल पोहोचणे आहे, मिलिंद नार्वेकर हे सुद्धा उद्धव  ठाकरे यांच्या जवळचे आहे, त्यांच्याबद्दलच माहिती दिली गेली आहे, याची त्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी  वैभव खेडेकर यांनी केली.

रामदास कदम आणि संजय कदम यांच्यामध्ये जुना वाद!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यावर उच्चन्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी दावा दाखल केला आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संजय कदम यांच्याविरोधात रामदास कदम यांचे चिरंजीव आणि विद्यमान आमदार योगेश कदम हे उभे होते त्यावेळी रामदास कदम यांची मानहानी होईल आणि त्यांची प्रतिष्ठेला डाग लागेल असे कृत्य संजय कदम यांनी केले होते.

भीषण! विमान आणि हेलिकॉप्टरची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू; पाहा VIDEO

तसंच त्यांच्या शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या डेन्टल कॉलेजच्या जागा जमिनीबाबत निराधार वक्तव्य केले होते रामदास कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात संजय कदम यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावेळी संजय कदम यांनी न्यायालयात रामदास कदम यांची विनाशर्त माफी मागितली होती व पुन्हा असे कृत्य करणार नाही, असे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

मात्र आपला मुलगा निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या विरोधात तसंच आपल्या शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या विरोधात काहीही संबंध नसताना आपल्यावर खोटे आरोप करत न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा भंग करत न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात रामदास कदम यांनी संजय कदम यांच्याविरोधात दावा दाखल केला.

First published: