मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज ठाकरेंचा मलाही फोन आला होता, सुधीर मुनगंटीवारांचा मोठा खुलासा

राज ठाकरेंचा मलाही फोन आला होता, सुधीर मुनगंटीवारांचा मोठा खुलासा

'काँग्रेस सोडून जे जे पक्ष देशाच्या हितासाठी काम करत आहेत, अशा सर्व पक्षाशी भाजपची युती होऊ शकते'

'काँग्रेस सोडून जे जे पक्ष देशाच्या हितासाठी काम करत आहेत, अशा सर्व पक्षाशी भाजपची युती होऊ शकते'

'काँग्रेस सोडून जे जे पक्ष देशाच्या हितासाठी काम करत आहेत, अशा सर्व पक्षाशी भाजपची युती होऊ शकते'

मुंबई, 26 जुलै: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) तोंडावर भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज ठाकरे (Raj Thackery) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही राज ठाकरे यांनी फोन करून भेटायला बोलावले, असा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावर भाष्य केले आहे.  'राज ठाकरे यांनी मलाही फोन केला होता. मी ही त्यांना भेटायला येत्या आठवड्यात जाईल.पण आज युतीचा विषय नाही. पण मला त्यांचा फोन आला होता की, आपण बऱ्याच दिवस भेटलो नाही, तेव्हा मी त्यांना भेटायला जाईल' असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

चहाच्या कपातली साखरही नाही शाकाहारी; उपवासासाठी वापरण्याआधी हे वाचा

तसंच, 'काँग्रेस सोडून जे जे पक्ष देशाच्या हितासाठी काम करत आहेत अश्या सर्व पक्षाशी भाजपची युती होऊ शकते, असं सूचक विधानही मुनगंटीवार यांनी केलं.

तसंच, सत्ताधारी पक्षाने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेवून मदतीचा निर्णय घ्यायला हवा. कोल्हापूर, सांगली मध्ये जेव्हा पूर आला तेव्हा आम्ही जीआर काढला होता. केंद्र सरकार मदत करेल तेव्हा करेलच. कारण त्याला तांत्रिक मुद्दे असतात. पण राज्य सरकारची ६५०० कोटी रुपये लसीकरणामध्ये वाचले आहे. सरकार व्यापाऱ्यांना मदत करत आहे. केली पाहिजे. पण या लोकांना आता तातडीच्या मदतीची गरज आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

नागरिकांची सनद कायदा केला आहे. त्याचा वापर केला पाहिजे. नागरिकांना अन्न धान्य ची मदत कधी किती करायची. 12000 कोटीचा पगार देणाऱ्या देणाऱ्या सरकारला लोकांना मदत करता येत नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला. त्यांनी सांगावे की मी पुन्हा एक महिन्याने आढावा घेऊन जे अधिकारी काम करात नसतील त्यांना घरी बसवले पाहिजे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

Weather Forecast Today: कोकणात पावसाचा जोर कमी; पुण्यात मात्र धो-धो कोसळणार

गेल्या वर्षी चंद्रपुरात पूर आला होतात, लोक बेघर झाली होती, त्यांना घर देवू म्हणून सांगितले होते त्या लोकांना अजून घर मिळाले नाही. मदतीसाठी राजकीय इच्या शक्ती हवीच. जे लोक झारीचे शुक्राचार्य आहेस त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली.

'शांततेसाठी जसा नोबेल पुरस्कार दिला जातो, तसा खोटे बोलण्यासाठी पुरस्कार द्यायचा झाला तर तो महाविकास आघाडीला दिला जाईल.  केंद्रापेक्षा जास्त पैसे हे राज्य सरकार घेत आहे. मग केंद्राला पैसे कमी करा सांगण्यापेक्षा राज्याने स्वत: कमी करावे, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

First published:
top videos

    Tags: Chandrakant patil, MNS, Raj Thackery, Sudhir mungantivar