जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Weather Forecast Today: कोकणात पावसाचा जोर कमी; पुण्यात मात्र धो-धो कोसळणार

Weather Forecast Today: कोकणात पावसाचा जोर कमी; पुण्यात मात्र धो-धो कोसळणार

Weather Forecast Today: कोकणात पावसाचा जोर कमी; पुण्यात मात्र धो-धो कोसळणार

Weather Forecast Today: आज राज्यातील तीन जिल्ह्यांनी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोरडं हवामान आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 26 जुलै: गेल्या आठवड्यात पुण्यासह (pune) कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) आणि कोकण (Konkan) किनारपट्टीला पावसानं झोडपल्यानंतर (heavy rainfall) आता राज्यात पावसानं काहीसी उसंत घेतली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण पावसाचा धोका अद्याप कमी झाला नाही. आज मुंबई वगळता आज राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर सर्व ठिकाणी हवामान खात्यानं (IMD) येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. त्यामुळे या परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील तीन जिल्ह्यांनी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोरडं हवामान आहे. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता सध्या कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाच्या पट्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील दोन दिवस कोकणात हीच स्थिती कायम राहणार आहे. पण आजपासून चौथ्या आणि पाचव्या दिवशी म्हणजेच 29 आणि 30 जुलै रोजी कोकणात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा- तो फोटो ठरला शेवटचा, हिमाचलमध्ये दरड कोसळून मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरची कथा आज पुण्यासह सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासूनच घाट परिसरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. नाशिकसह कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

जाहिरात

हेही वाचा- पूरग्रस्त भागात मृत्यूतांडव! 164 जणांनी गमावले प्राण, 25564 जनावरांचा पडला खच कोकणात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता गुजरातच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस कोकणात पावसाचा जोर कमी राहणार आहे. मात्र 29 आणि 30 जुलै रोजी पुन्हा कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या कोकणातील पुरस्थिती सुधारताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमी होत आहे. पण कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अद्याप 100 जण बेपत्ता आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या अस्मानी संकटामुळे राज्यात 25 हजाराहून अधिक जनावरं दगावली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात