Home /News /crime /

सणकी! छेडछाडीला विरोध करणाऱ्या पैलवान तरुणीची कोचकडून हत्या, भावालाही घातल्या गोळ्या

सणकी! छेडछाडीला विरोध करणाऱ्या पैलवान तरुणीची कोचकडून हत्या, भावालाही घातल्या गोळ्या

आपण करत असलेल्या (Wrestling coach murdered his student girl and his brother) छेडछाडीला विरोध केल्याचा राग मनात ठेऊन एका कुस्तीच्या कोचचं त्याच्या विद्यार्थिनीची आणि तिच्या भावाची हत्या केली आहे.

    सोनिपत, 11 नोव्हेंबर: आपण करत असलेल्या (Wrestling coach murdered his student girl and his brother) छेडछाडीला विरोध केल्याचा राग मनात ठेऊन एका कुस्तीच्या कोचचं त्याच्या विद्यार्थिनीची आणि तिच्या भावाची हत्या केली आहे. हा कोच प्रशिक्षण देत असताना (Murder as she opposed him) तरुणीची छेड काढत होता. त्याला तरुणीने आक्षेप घेतला. मात्र आपल्याविरुद्ध आपलीच प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी कसा काय आक्षेप घेऊ शकते, असा सवाल करत त्याने तिची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. तरुणीच्या भावालादेखील त्याने गोळ्या घालून (Firing on brother)a त्याची जीवनयात्रा संपवली. तरुणीचं पैलवान होण्याचं स्वप्न हरियाणातील सोनिपत परिसरात राहणारी निशा ही कुस्तीचं प्रशिक्षक घेत होती. तिला पवन नावाचा प्रशिक्षक कुस्तीचं प्रशिक्षण देत होता. पवन आणि निशा हे लांबचे नातेवाईकदेखील होते. त्यामुळे पवनवर विश्वास ठेऊन निशाच्या घरच्यांनी तिला प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांतच पवनचं वागणं बदलल्याचं तिच्या लक्षात येऊ लागलं. प्रशिक्षण देण्याच्या बहाण्यानं तो तिची छेड काढू लागला. याला तिने तीव्र विरोध केला आणि आपल्या वाट्यालाही न जाण्याचा इशारा दिला. रागातून केली हत्या आपल्याला विरोध केल्याच्या रागातून आरोपी पवननं निशा आणि तिच्या भावाची गोळ्या घालून हत्या केली. यावेळी निशाच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनादेखील आरोपी पवननं जबर मारहाण केली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दोघांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी पवन दुचाकीवरून पळून गेला. मुलीचा ब्रेनवॉश केल्याचा आरोप आरोपी कोच पवनने आपल्या मुलीचा ब्रेनवॉश करत तिच्याकरवी आपल्याकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याची माहिती निशाच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. निशाला मोठी पैलवान करण्याचं स्वप्न दाखवून वेगवेगळ्या कारणांसाठी तो तिच्याकडून पैसे उकळत असे. नात्यातील व्यक्ती असल्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, मात्र अखेर त्याने विश्वासघातच केल्याचा आरोप निशाच्या वडिलांनी केला आहे. हे वाचा- मुलीचा जोडीदार पसंत नसल्याने Honor Killing, कुटुंबीयांनी ओलांडली क्रौर्याची सीमा पोलीस तपास सुरू पोलिसांनी आरोपी पवनच्या शोधासाठी पथकं तैनात केली असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असं म्हटलं आहे. पवनला जिवंत पकडून देणाऱ्यावर 1 लाख रुपयांचं इनामही घोषित करण्यात आलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Haryana, Murder, Police

    पुढील बातम्या