सोलापूर, 10 नोव्हेंबर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील कुसळंब येथे एका 22 वर्षीय युवकाने आत्महत्या (Husband commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी गेल्याच्या कारणातून तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
विशाल चौगुले असं आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय युवकाचं नाव आहे. मृत विशालची पत्नी गेल्या काही दिवसांपासून माहेरी गेली होती. त्यामुळे मृत विशालला नैराश्य आलं होतं. पत्नी माहेरी गेल्याचा विरह सहन न झाल्याने विशालने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-सातारा हादरलं! आधी झोपेतून उठवलं मग..; सख्खा भावाला मध्यरात्री दिला भयंकर मृत्यू
41 वर्षीय रविराज चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशाल हा 8 नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या घरातून बाहेर पडला होता. रात्र होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. दरम्यान शोधाशोध सुरू असताना, मयूर सावंत यांनी विशालच्या नातेवाईकांना फोन करून विशालने गळफास घेतल्याची माहिती दिली.
हेही वाचा-मुंबई: कामगारानं घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं अपहरण केलं अन्...
कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता, विशाल एका खोलीत दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. विशालला अशा स्थितीत पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. या घटनेची माहिती बार्शी तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या अधारे गुन्ह्याची नोंद केली आहे. पत्नी माहेरी गेल्यानं विरह सहन न झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Husband suicide, Solapur