मुंबई, 17 डिसेंबर : 'कांजूरमार्गच्या जागेवर (metro car shed kanjurmarg) आधीच्या सरकारला गृहनिर्माण प्रकल्प राबवणार होते. पोलिसांची घरं बांधणारं होतं. मग आता काय झालं? विलंब करायचा, रोष निर्माण करायचा हा घाट कशाला?' असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला विचारला आहे.
मुंबईतील कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिल्यामुळे ठाकरे सरकारला धक्का बसला आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आधार कार्डच्या माध्यमातून 10 मिनिटांमध्ये बनवा PAN Card, वाचा काय आहे प्रक्रिया
'मेट्रो कारशेडच्या कामाला थांबवण्याचा आदेश दिला आहे, तो दुर्दैवी आहे. याचा आम्ही विचारत आहोत. पण कांजूरमार्गच्या जागेत नेते काही बंगले बांधणार नाहीत, हा निर्णय दुर्दैवी आहे. आधीचं सरकार याच जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प राबणार होतं, पोलिसांची घरं बांधणार होतं, मग आता काय झालं? विलंब करायचा, रोष निर्माण करायचा हा घाट घातला जात आहे. बेकायदा बांधकाम तोडण्याबाबत सरकार कारवाई करत असेल तर ते चुकीचे, आणि जे चांगले काम करत आहे, तेही चुकीचे, असं आम्ही कधी पाहिलं नाही' अशी टीका राऊत यांनी केली.
'ज्यांना न्याय द्यायचा त्यांना मिळत नाही. तिथे तारीख पे तारीख, न्याय नाही. प्रकाश आंबेडकरांचं विधान महत्वाचं आहे. विरोधी पक्षाने हा राजकीय विषय केला आहे. त्यात न्यायालयाने पडू नये, जमीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग निर्णय न्यायालयाचा का? असा सवालही राऊत यांनी विचारला.
IND vs AUS : मॅचआधी स्मिथने विचारला प्रश्न, वडिलांच्या आठवणीने विराट झाला भावुक
'काही कामं केलं की सीबीआय, ईडी लावायची हे चुकीचं आहे. राज्यात भाजपचं सरकार नसल्याने हे सगळं घडत आहे. अहंकाराची परिभाषा पाहावी लागेल, आरेचं जंगल वाचवणं, प्राणी वाचवणं यात कोणता अहंकार आहे. महाराष्ट्रात सरकार नाही, याचं दुःख आम्ही समजू शकतो, पण अशा प्रकारे त्रास देणं हे फार काळ चालणार नाही', असा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला.
'ठोस निर्णय फक्त कांजूरमार्गचा कारशेड, आणि बाकी गोष्टीत काही नाही. शेतक-यांच्या आंदोलनाबाबत ठोस निर्णय घ्यायला सरकारला वेळ नाही. ज्या सरकारला शेतक-यांबद्दल काहीच पडलं नाही, त्यांच्याबद्दल काय बोलावं? असा सवालही राऊत यांनी विचारला.