जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आधार कार्डच्या माध्यमातून 10 मिनिटांमध्ये बनवा PAN Card, वाचा काय आहे प्रक्रिया

आधार कार्डच्या माध्यमातून 10 मिनिटांमध्ये बनवा PAN Card, वाचा काय आहे प्रक्रिया

आधार कार्डच्या माध्यमातून 10 मिनिटांमध्ये बनवा PAN Card, वाचा काय आहे प्रक्रिया

आयकर विभागाच्या (Income Tax) माध्यमातून आता पॅन कार्ड (Pan Card) बनवणं खूप सोपं झालं आहे. जाणून घ्या ई-पॅन कशाप्रकारे मिळवाल

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 डिसेंबर: आजकाल अनेक कामं ऑनलाइन करणं शक्य झालं आहे. त्यामुळे वेळ वाचण्याबरोबरच गुंतागुंतीची प्रक्रिया देखील करावी लागत नाही. पॅन कार्ड (PAN Card) बनवण्याची प्रक्रिया देखील सोपी झाली आहे. याआधी पॅन कार्ड बनवण्यासाठी मोठा फॉर्म भरावा लागत असे, आता काही क्लिक्सनंतर काही मिनिटांतच तुम्ही पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता. आयकर विभागाने (Income Tax) अशी सुविधा सुरू केली आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्डाचा (Aadhar Card) वापर करून हे काम करू शकता. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला इन्स्टंट पॅन कार्ड मिळेल. इन्स्टंट ई-पॅन कार्डसाठी अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला केवळ आधार कार्ड क्रमांक एंटर करावा लागेल. त्यांनंतर तुमच्या लिंक करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओटीपी (OTP) पाठवला जाईल. ज्याप्रमाणे आधार कार्ड Unique Identification Authority of India (UIDAI) कडून जारी केले जाते, त्याप्रमाणे आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते. यामध्ये 10 आकडी अल्फान्यूमेरिक (digit alphanumeric) असतात. पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर 10 मिनिटांमध्ये तुमचं पॅनकार्ड PDF फॉरमॅटमध्ये जारी केलं जाईल. ई-पॅन फिजिकल कॉपी प्रमाणेच आहे, मात्र तुम्ही 50 रुपये शुल्क देऊन पॅनकार्ड रिप्रिंटची ऑर्डर देऊ शकता. ज्यानंतर तुम्हाला लॅमिनेटेड पॅन कार्ड मिळेल. आधार कार्डाच्या माध्यमातून पॅन बनवण्याची प्रक्रिया -सर्वात आधी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावं लागेल -याठिकाणी Instant PAN through Aadhaar या सेक्शनमधील Quick Links वर क्लिक करा -यानंतर Get New PAN वर क्लिक करा -यानंतर नवीन पॅन कार्डसाठी तुमचा आधार क्रमांक आणि Captcha कोड टाकावा लागेल. -ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असणाऱ्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर e-PAN जारी केले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात