जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / होम आयसोलेशन पूर्णपणे बंद, कोविड सेंटरमध्ये व्हावे लागणार दाखल, राजेश टोपेंनी केले जाहीर

होम आयसोलेशन पूर्णपणे बंद, कोविड सेंटरमध्ये व्हावे लागणार दाखल, राजेश टोपेंनी केले जाहीर

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

‘लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला राज्याला कोणताही प्रतिसाद नाही. त्यामुळे केंद्राने लशी आयात करावी आणि ती राज्याला पुरवावी’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मे : राज्यात कोरोनाची (Corona) तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. खबरदारी म्हणून 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन (Home insulation) पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड सेंटर (Covid center) वाढवून तिथे आयसोलेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनाबद्दल माहिती दिली. ‘लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला राज्याला कोणताही प्रतिसाद नाही. त्यामुळे केंद्राने लशी आयात करावी आणि ती राज्याला पुरवावी. 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर आहे, त्यासाठी लागणार्‍या लसीचे पैसे राज्य सरकार द्यायला तयार आहेत’ असं टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रियांका चोप्राचं नवं फोटोशूट, हॉट PHOTOS नं वाढवलं सोशल मीडियाचं तापमान ‘उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १८ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची बैठक झाली. 2245 रुग्ण या क्षणाला म्युकरमाकोसिसचे आहेत. आरोग्य विभागाने याला नोटीफाईड आजार घोषित केला आहे. रुग्ण आणि त्यांच्याबाबतची माहिती शासनाला देणे बंधनकारक आहे. याला लागणारे एम्फोटेरेसिन इंजेक्शन्सचे नियंत्रण केंद्र सरकारने केलेला आहे.  केंद्र सरकार आपल्याला देईल ते आपण प्रत्येक जिल्ह्यात याचे वाटप करतो. त्यामुळे या रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. यावर मोफत उपचार झाले पाहिजेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी 30 कोटी रुपयांची तरतुद केली आहे, 131 रुग्णालयात यावरील उपचारांसाठी निश्चित केले आहेत’ असंही टोपे म्हणाले. मोदींकडे कंगना, प्रियंकासाठी वेळ पण संभाजीराजेंसाठी नाही! सचिन सावंत यांची टीका ‘2200 पैकी 1007 रुग्ण महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दाखल आहेत. त्यांच्यावर मोफत उपचार सुरू आहेत. खाजगी रुग्णालयात मोफत उपचार किंवा शासन ठरवेल त्या दराने बिल आकारावे यासाठी प्रयत्न करतोय .म्युकरमाकोसिसबाबत आम्ही जागरूक आहोत. रुग्ण वाढू नये, प्रसार होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मास्क दंड आणि इतर माध्यमातून उपलब्ध झालेले पैसे म्युकरमाकोसिसच्या जनजागृतीसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. एम्फोटेरेसिन इजेक्शनच्या 60 हजार व्हाईल 1 जून रोजी राज्याला उपलब्ध होणार आहेत, असंही टोपेंनी सांगितलं ‘कोरोनाचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यावर, तर पॉझिटिव्ह रेट १२ टक्क्यावर आला आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट झाले नसेल त्या जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत’, अशी माहितीही टोपेंनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात