मुंबई, 25 मे: सुप्रीम कोर्टानं (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्यानंतर आता राज्यात या मुद्द्यावरून तूतू-मैमै सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी दौरा काढला असून. 27-28 मे रोजी मुंबईत ते मुख्यमंत्री आणि भाजप तसेच इतर सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र त्यापूर्वी त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधानांनी वेळ दिली नसल्याचं सांगितल्यानं आता पंतप्रधानांवर आरोपांचं सत्र सुरू झालं (PM not have time to meet Sambhajiraje) आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पंतप्रधानानंचे सेलिब्रिटींबरोबरचे फोटो पोस्ट करत टीका केली आहे. (वाचा- …याचा अर्थ राज्यपालांनी यादी दाबून ठेवली, नाना पटोलेंचा घणाघात ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात चार पत्रे पाठवली. मात्र तरीही पंतप्रधानांनी भेटीची वेळ दिली नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्या मुद्द्यावरून आता पंतप्रधानांवर टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. कंगना रनौत आणि प्रियंका चोप्रा बरोबरच्या पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो पोस्ट करत सचिन सावंत यांनी सवाल उपस्थित केला. पंतप्रधानांना प्रियांका चोप्रा आणि कंगनाला द्यायला वेळ आहे, पण संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही. संभाजीराजेंना भेट न देणं हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचं सचिन सावंत म्हणाले आहेत. (वाचा- सापडली..,सापडली, 12 आमदारांची यादी सापडली, राजभवनाकडून अखेर खुलासा ) दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींच्या प्रतिक्रियेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. संभाजीराजे यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटायचं होतं. पण हा राज्याच्या अख्त्यारितील विषय आहे. केंद्राचा त्याच्याशी संबंध नाही. त्यामुळं भेटून उपयोग नसल्याने भेट दिली नसेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावर महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. pic.twitter.com/L9I3AC664C
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 25, 2021
सचिन सावंत यांच्याशिवाय राज्यातील इतर विरोधकही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर या मुद्द्यावरून टीका करत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी मी समाजासाठी लढत असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही पक्षाने किंवा राज्य आणि केंद्रानं एकमेकांकडे बोटं दाखवून समाजाला वेठीस धरू नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यात आता मोदींनी भेट न देण्याचं प्रकरण गाजत आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा हा मुद्दा कशा पद्धतीनं राज्यात हाताळला जाणार आहे. याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.