सावधान! 'हिका' चक्रीवादळामुळे कोकणात हाय अलर्ट, आज रत्नागिरीत महत्त्वाची बैठक

सावधान! 'हिका' चक्रीवादळामुळे कोकणात हाय अलर्ट, आज रत्नागिरीत महत्त्वाची बैठक

सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्या जवळून चक्रीवादळ जाण्याचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे.

  • Share this:

मुंबई 1 जून: पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रिवादळाने तांडव निर्माण केलं होतं. त्यातून सावरत असतानाच आता महाराष्ट्राला ‘हिका’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय. पुढच्या 48 तासांत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. 3 जूनच्या सुमारास हे वादळ गुजरातमधून महाराष्ट्रात येईल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्या जवळून चक्रीवादळ जाण्याचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याच बरोबर चक्रीवादळामुळे आपतकालिन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत आज दुपारी १२ वाजता  जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यांच्या समुद्र किनाऱ्यावर सतर्कता वाढवण्यात आल्याचंही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा -

महाराष्ट्राच्या मदतीला धावला केरळ, 50 डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथक मुंबईत दाखल

पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ कायम

राज्यातल्या या 5 लाख विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद पडणार का? पालक चिंतेत

First published: June 1, 2020, 7:15 AM IST
Tags: cyclone

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading