मुंबई 31 मे: कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना आता केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे. सरकारच्या विनंती नंतर केरळने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. हे पथक सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलं असल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिलीय. दुसऱ्या 50 डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथकही लवकरच मुंबईत दाखल होणार होणार आहे असल्याची माहिती थॉमस इसाक यांनी दिली. देशात सगळ्यात पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर केरळने शर्थिचे प्रयत्न करत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवलं. त्यानंतर त्या पॅटर्नची चर्चा सर्व देशात झाली होती. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनीही केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करत त्यांनी कलेले प्रयत्न जाणून घेतले होते. महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याने महाराष्ट्र सरकारतर्फे मदतीसाठी डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत करण्याची विनंती केरळ सरकारला करण्यात आली होती. त्या विनंतीनंतर केरळ सरकारने हे पथक पाठवलं आहे. महाराष्ट्रातल्या काही संघटनांनी केरळमधल्या नर्सेस महाराष्ट्रात येण्यास विरोध केला होता. आधी आपल्या इथे कमी असेल्या जागा भरा आणि नंतर इतर राज्यातून कर्मचाऱ्यांना बोलवा असा युक्तिवाद त्यांनी केला होता.
A 100 member medical team of doctors and nurses from Kerala led by Santhosh Kumar Dy. Superintendent of TVM Medical College volunteers to assist Mumbai doctors in the battle against Covid19.Advance team has already reached Seven Hills Hospital.Doctors without borders!
— Thomas Isaac (@drthomasisaac) May 31, 2020
मुंबईसह उपनगरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये शनिवार अवघ्या 2 तासांत 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील बहुतांश हॉस्पिटलमध्ये हाहाकार उडाला आहे. सर्व रुग्णांचा मृत्यू आयसीयूमध्ये ऑक्सिजन लेव्हल (Low Oxygen) कमी झाल्यामुळे झाला, अशी धक्कादायक माहिती एका नर्सनं दिली आहे. हेही वाचा.. दिलासा! अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार, उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा खुलासा नर्सनं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या एका आठवड्यात जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये 12 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. येथे वरिष्ठ डॉक्टरांची कमतरता असल्यानं रुग्णांवर योग्य उपचार घेतले जात नाहीत.