जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ कायम

पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ कायम

त्याआधी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितलं की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून खूप काही शिकलो आहे आणि तशीच कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयानक असणार आहे.

त्याआधी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितलं की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून खूप काही शिकलो आहे आणि तशीच कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयानक असणार आहे.

दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने पुणेकरांची चिंता वाढली आहे दररोज आकडा वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही वाढत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे 31 मे: दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने पुणेकरांची चिंता वाढली आहे दररोज आकडा वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही वाढत आहे. त्यामुळे क्रिटीकर रुग्णांना वाचवतानाच कोरोनाला अटकाव कसा करायचा याचं मोठं आव्हान सरकारसमोर निर्माण झालं आहे. आज दिवसभरात २७१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. तर दिवसभरात १३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सहा करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ६४७२ एवढी झाली आहे. त्यात डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-५९५५ आणि ससून ५१७ असे रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २३७६ एवढी आहे. तर एकूण ३१४ जणांचा मृत्यू झालाय. आजपर्यंतच एकूण ३७८२ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज ३५९ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून राज्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. चित्रपट आणि मालिकांच्या शुटिंगबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय राज्याच्या मुख्य सचिवांनी ही नियमावली जाहीर केली आहे. केंद्राने जारी केलेल्या नियमांप्रमाणेच राज्य सरकारकडूनही कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता आणलेली नाही. मात्र इतर भागात सूट देण्यात आली असून त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत. लॉकडाऊनसाठी काय आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्स? नाईट कर्फ्यू - रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी व्यायामासाठी खुल्या मैदानात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. (सकाळी 5 ते सांयकाळी 7) मात्र गर्दी करण्यास बंदी 5 जूनपासून काही भागातील दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी नाही भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन झालंय; ICMR च्या सदस्यांनीही केलं मान्य नियमांचं उल्लंघन केल्यास दुकाने बंद करणार वाहनांनाही परवानगी, मात्र प्रवासी संख्येला मर्यादा कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी दिली जाईल. या भागांमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाईल या झोनमध्ये येण्यास किंवा बाहेर जाण्यास परवानगी नाही कन्टेन्मेंट झोनबाबत महापालिकांना अधिकार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात