जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / राज्यातल्या या 5 लाख विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद पडणार का? पालक चिंतेत

राज्यातल्या या 5 लाख विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद पडणार का? पालक चिंतेत

राज्यातल्या या 5 लाख विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद पडणार का? पालक चिंतेत

सोशल डिस्टन्ससिंगच्यामुळे या आश्रम शाळा सुरु करणे कठीण आहे व डोंगराळ भागात रेंज नसल्याने तिथे ऑनलाइन शिक्षणही कठीण आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 31 मे: कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आता लॉकडाऊनमध्ये सुट दिल्याने व्यवहार सुरू होतील. मात्र शाळा केव्हा सुरू होतील याविषयी कमालीची साशंकता निर्माण झालीय. शहरातल्या शाळा ऑनलाईन सुरू होऊ शकतात. मात्र दुर्गम खेड्यात राहणारे आदिवासी विद्यार्थी भटके विमुक्त विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू शकतात. राज्य सरकारने त्यांच्या शिक्षणाकडे लक्षं द्यावं अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. हेरंब कुलकर्णी म्हणाले, सध्याच्या शिक्षणाच्या चर्चेत आश्रमशाळांचा प्रश्न मांडायला हवा. राज्यात 1048 आदिवासी आश्रम शाळा आहेत. त्यात जवळपास चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत व समाज कल्याण च्या 800 आश्रमशाळेत  जवळपास एक लाख विद्यार्थी आहेत. सोशल डिस्टन्ससिंगच्यामुळे या आश्रम शाळा सुरु करणे कठीण आहे व डोंगराळ भागात रेंज नसल्याने तिथे ऑनलाइन शिक्षणही कठीण आहे यातून या आदिवासी व भटक्या विमुक्त मुलांची गळती होऊ शकते याचा राज्य शासनाने विचार करण्याची गरज आहे अशी मागणीही हेरंब कुलकर्णी यांनी केली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे संकटात सापडलेल्या पुणेकरांना पालिकेने दिला मोठा दिलासा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे.  तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे, एका बाकावर एक विद्यार्थी, अशा अनेक मुद्यांवर शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत चर्चा झाली. Lockdown 5 : दुकानं उघडण्यासाठी असतील हे नियम, मॉल्ससह अजून काय राहणार बंद? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. त्यात मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ज्ञही उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात