जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई-ठाणेकर सावधान! WeekEndला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई-ठाणेकर सावधान! WeekEndला मुसळधार पावसाचा इशारा

पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते.

पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते.

13 आणि 14 जून रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जून : मुंबई-ठाण्यासह उपनगर आणि पालघरमध्ये 13 आणि 14 जून रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. खरं तर राज्यात मान्सून 11 जूनपर्यंत धडकेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेला आहे. केरळमध्ये जरी मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र येण्यात विलंब झाला आहे. मागच्या वर्षी मान्सून जवळपास 2 आठवडे उशिरा म्हणजे 25 जूनपर्यंत आला होता. कोकण किनारपट्टीत सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होईल. गेले दोन दिवस तळकोकणात आणि गोव्यात हलक्या सरी कोसळत आहेत. दक्षिणेच्या किनारपट्टी भागात मान्सून बुधवारी दाखल होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली. हे वाचा- क्या बात! लॉकडाऊनच्या काळात 83 टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर खूश दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मुंबई- ठाण्यासह उपनगर आणि पालघरमध्ये 13 आणि 14 जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पहिल्यात टप्प्यात पावसाचा जोर राहाणार आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली होती. ती पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. केरळमध्ये वेळेवर पोहोचलेला मान्सून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे कर्नाटकमध्येच अडला होता. आता मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण निर्माण झाल्यानं मान्सून येत्या 48-72 तासांत दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हे वाचा- आधी कोरोना रुग्णांची सेवा, मग लग्न; तब्बल दीड महिन्यांनी कोरोना योद्धा विवाहबद्ध संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात