तुरुंगात असलेल्या 'या' बाबाचे भक्त होते बुरांडीचं कुटुंब

बुरांडी कुटुंबातल्या 11 जणांचा मृत्यू झाला. ते सगळे जण एका बाबाचे भक्त होते. त्यांच्या सांगण्यानुसार हे कुटुंब पूजापाठ करायचे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2018 02:28 PM IST

तुरुंगात असलेल्या 'या' बाबाचे भक्त होते बुरांडीचं कुटुंब

नवी दिल्ली, 02 जुलै : बुरांडी कुटुंबातल्या 11 जणांचा मृत्यू झाला. ते सगळे जण एका बाबाचे भक्त होते. त्यांच्या सांगण्यानुसार  हे कुटुंब पूजापाठ करायचे. घरात मिळालेल्या डायरीनुसार अशा काही गोष्टी स्पष्ट होतायत.

सूत्रांच्या माहितीनुसार या कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकानंही याच बाबाचं नाव घेतलंय. हा बाबा आता तुरुंगात आहे. याशिवाय अनेक बाबांची नावं घेतली जातायत.  हा तुरुंगात बंद असलेला बाबा हरी भगवानचा उपासक आहे.

मिळालेल्या डायरीत हरी भगवानची प्राप्ती कशी होणार, कधी होणार याबद्दल लिहिलंय. पोलिसांना घरात पूजाविधीचं साहित्यही मिळालं.

त्या डायरीमध्ये काय नोंदी होत्या?

  Loading...

 1. डोळ्यावर चांगल्या प्रकारे पट्टी बांधा
 2. तुमच्या समोर शून्यच दिसलं पाहिजे
 3. दोरखंडासोबत सुती ओढण्या किंवा साडी वापरायची
 4. सात दिवस सतत पूजा करायची. मोठ्या श्रद्धेनं साधना करायची. कोणी गेलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करायचं.
 5. बेबे उभी राहू शकत नाही तर दुसऱ्या खोलीत आडवी होऊ शकते
 6. सगळ्यांचे विचार सारखेच असावेत. असं केलंत तर पुढची कामं व्यवस्थित होऊ शकतात.
 7. मंद प्रकाश असावा
 8. हाताच्या पट्ट्या राहिल्या तर मग डोळ्यावर डबल बांधायच्या
 9. तोंडावरची पट्टीही डबल करा
 10. रात्री 12 ते 1मध्ये ही क्रिया करायची आहे. याआधी होम करायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...