मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

हाथरस प्रकरणावरून रामदास आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले...

हाथरस प्रकरणावरून रामदास आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले...

'मी नटींच्या गराड्यात नाही तर कायम कार्यकर्त्यांच्या गर्दीत असतो. हे राऊत यांना माहीत नसावं'

'मी नटींच्या गराड्यात नाही तर कायम कार्यकर्त्यांच्या गर्दीत असतो. हे राऊत यांना माहीत नसावं'

'मी नटींच्या गराड्यात नाही तर कायम कार्यकर्त्यांच्या गर्दीत असतो. हे राऊत यांना माहीत नसावं'

मुंबई, 07 ऑक्टोबर : 'शिवसेनेचे खासदार संजय राऊत मला विचारतात की मी कुठे आहे? मी हाथरस इथं जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली, ते गेले का हाथरसला? मी पँथरमधून तयार झालेला एक कार्यकर्ता आहे. संजय राऊत यांनी मला दलितांबद्दल शिकवू नये' अशा शब्दांत  रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

रामदास आठवले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून आठवले यांच्यावर हाथरस प्रकरणावर मौन बाळगल्यामुळे सडकून टीका केली होती.

हाथरसमधील पीडित कुटुंबीयांची मी भेट घेऊन आलो आहे. आमच्या पक्षाकडून त्यांना पाच लाखांची मदत केली आहे. तसंच अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना पुरेशी संरक्षण देण्याबाबत सांगितले आहे. संजय राऊत विचारत आहेत की, हाथरस मधला बलात्कार झाला तेव्हा मी कुठे होतो. मी एका नटीच्या समर्थनात उतरलो. पण मी कंगनाला मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली, संरक्षण दिले. मी पँथरमधून तयार झालेला कार्यकर्ता आहे. संजय राऊत यांनी मला दलितांबद्दल शिकवू नये, असा सणसणीत टोला आठवले यांनी राऊतांना लगावला.

'संजय राऊत हे पायल घोषवर झालेल्या अत्याचारावर का बोलत नाहीत? मी नटींच्या गराड्यात नाही तर कायम कार्यकर्त्यांच्या गर्दीत असतो. हे राऊत यांना माहीत नसावं', असंही आठवले म्हणाले.

तसंच, 'राहुल गांधी यांनी हाथसर येथे राजकारण करण्यासाठी  गेले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटलं पाहिजे पण फक्त राजकारणासाठी त्याठिकाणी जाऊ नये. राजस्थानमध्ये बलात्कार झाला तिथे राहुल गांधी का नाही गेले.कारण काँग्रेस सरकार तिथं आहे म्हणून जात नाही का? अशोक गहलोतांना राहुल गांधी जाब का विचारत नाहीत? असा सवालही आठवलेंनी विचारला.

'खडसेंनी रिपाइंमध्ये यावे'

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा निर्थक आहे. खडसे हे भाजपातून राष्ट्रवादी पक्षात जाणार नाही. कारण राष्ट्रवादीत त्यांना आता काही त्यांना मिळणार नाही. त्यामुळे खडसे यांनी आरपीआय पक्षात यावे, अशी ऑफरच आठवलेंनी खडसेंना दिली.

'शरद पवार हे आदरणीय'

'शरद पवार हे माझं मत गांभिर्याने घेत नाही, असं नाही. ते आदरणीय आहेत, मी व्यक्त केलेले मत लोकांना आवडत असेल अथवा आवडत नसेल, पण मला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे', असंही रामदास आठवले म्हणाले.

First published:

Tags: RPI, Sanjay raut, Shivsena, रामदास आठवले, शरद पवार