मुंबई, 05 सप्टेंबर: मुंबईतील (Mumbai) चांदिवली परिसरात एका दिव्यांग व्यक्तीनं (Handicapped man) आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Brutal Murder of Wife) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिला घरात झोपलेली असताना दिव्यांग पती रांगत रांगत तिच्याजवळ गेला. यानंतर तिच्यावर चाकूनं सपासप वार (Attack with sharpen knife) केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Accused Husband Arrest) केली आहे. हत्येनंतर घरातील अवस्था पाहून पोलिसही हादरले आहेत. आरोपीनं अत्यंत भयंकर पद्धतीनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शंकर त्रिमुखे असं आरोपीचं नाव असून ते मुंबईतील चांदिवली परिसरात वास्तव्याला आहे. पाच वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांनी दोन्ही पाय गमावले आहेत. तर कोंडाबाई त्रिमुखे असं हत्या झालेल्या 67 वर्षीय पत्नीचं नाव आहे. दोन्ही पाय गमावल्यानंतर आरोपी शंकरला नैराश्य आलं होतं. तसेच मागील काही काळापासून ते आजारीही होते. यातूनच त्यानं आपल्या पत्नीवर अशा प्रकारचा अमानुष हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोंडाबाई यांनी बुधवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण त्याच दिवशी उपचारादरम्यान त्याचं निधन झालं आहे.
हेही वाचा-आधी भाची मग 21 वर्षीय आत्यासोबत घडलं विपरीत; चौघांच्या कृत्यानं सातारा हादरलं
लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, 67 वर्षीय मृत कोंडाबाई ह्या बुधवारी रात्री आपल्या घरात झोपल्या होत्या. दरम्यान आरोपी शंकर हातात धारदार चाकू घेऊन रांगत रांगत पत्नीपर्यंत पोहोचला. यावेळी त्यानं पत्नीला काही कळायच्या आत तिच्या छातीवर, पोटावर आणि कंबरेवर धारदार चाकूनं सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, कोंडाबाई यांच्या किंचाळ्या ऐकून त्यांची सूनही खडबडून जागी झाली. सासूसोबत घडलेला सर्व प्रकार सुनेनं आपल्या डोळ्यादेखत पाहिला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-...म्हणून कुटुंबातील सर्वांचा केला खेळ खल्लास; हत्यारोपी मुलाचे धक्कादायक खुलासे
पोलिसांनी घटनास्थळावरूनचं दिव्यांग आरोपी शंकर त्रिमुखेला अटक केली आहे. यावेळी पोलिसांना घरात सांडलेल्या रक्ताचे डाग आढळून आले आहेत. वृद्ध दाम्पत्यांमध्ये अनेकदा वाद व्हायचा. तसेच आरोपी शंकर त्रिमुखे याची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे त्यांचं मानसिक स्थिती ढासळली होती. यातूनच त्यांनी आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पवई पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Murder