सातारा, 05 सप्टेंबर: सातारा शहरानजीक वास्तव्याला असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह तिच्या 21 वर्षीय आत्यासोबत परप्रांतीय चार जणांनी धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास दुकानातून दूध घेऊ घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रोखून आरोपींनी तिच्या अंगाशी झोंबाझोंबी (Minor Girl Molestation) केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जाब विचारण्यास गेलेल्या 21 वर्षीय तरुणीसोबतही आरोपींनी विकृत कृत्य केलं आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं सातारा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत (Molestation and POCSO) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अमित भाटी, कांझी भाटी, पिता सोलंकी, शंकर सोलंकी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं असून चारही आरोपी राजस्थानातील रहिवासी आहेत. लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, 1 सप्टेंबर रोजी (बुधवार) रात्री साडे आठच्या सुमारास एक अल्पवयीन पीडित मुलगी दुकानातून दूध घेऊन आपल्या घरी जात होती. दरम्यान आरोपी पिता सोलंकी आणि कांझी भाटी यांनी अल्पवयीन मुलीला अडवलं. दोघांनी तिच्या अंगाशी झोंबाझोबी करत तिच्याशी गैरप्रकार केला. हेही वाचा- पुण्यातील तरुणीला आईच्या Relationshipचा लागला सुगावा; बॉयफ्रेंडच्या मदतीनं उकळले लाखो रुपये यानंतर भेदरलेल्या अल्पवयीन मुलीनं घरी जाऊन तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या 21 वर्षीय आत्याला सांगितला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर 21 वर्षीय आत्या जाब विचारण्यासाठी आरोपींकडे गेली. यावेळी आरोपी शंकर सोलंकी यानं जाब विचारणाऱ्या तरुणीच्या कपाळावर चाकूनं वार केला. तर पिता सोलंकी यांनं लोखंडी पाइपनं फिर्यादीच्या पायावर मारहाण केली. याचवेळी आरोपी अमित भाटीनं फिर्यादी तरुणीच्या जाव्या हाताच्या कोपऱ्यावर लाकडी दांडक्यानं मारहाण (4 Accused beat 21 years old woman) केली. हेही वाचा- लग्नाचं आमिष दाखवून युवतीचं लैंगिक शोषण; भाजप खासदाराच्या मुलाचं धक्कादायक कृत्य या धक्कादायक घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या आत्यानं सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कलमांतर्गत अमित भाटी, कांझी भाटी, पिता सोलंकी, शंकर सोलंकी अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.