गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत निघाणारी शोभायात्रा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. यंदाही मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली. या शोभायात्रेचं यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष होतं. त्या निमित्तानं डोंबिवलीकर मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी झाले होते. घोड्यावर मोठ्या ऐटीत स्वार झालेली छोटी रणरागिणी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली होती. ढोल-ताशांच्या गजरानं शोभायात्रेत एक निराळंच चैतन्य पसरलं होतं. मराठी कलाकार मयुरी वाघ ही डोंबिवलीची आहे. डोंबिवलीकर मयुरी दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रेत सहभागी झाली होती. शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिला रणरागिणींनी यावेळी प्रात्याक्षिक सादर करत सर्वांची मनं जिंकली. नऊवारी साडीमध्ये प्रात्याक्षिक सादर करणाऱ्या या महिलांचं कौशल्य पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. मैदानी प्रात्याक्षिकाप्रमाणेच बाईक रॅलीमध्येही मराठमोळ्या वेषामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या. डोंबिवलीची ओळख असलेल्या या परंपरेत सहभागी होण्यात दिव्यांग नागरिकही आघाडीवर होते. डोंबिवलीकरांमध्ये आरोग्यविषय जनजागृती करण्याचं कामही यावेळी करण्यात आलं.